Tamil Nadu: तामिळनायडूत टीव्हीके १० जागापासून दूर; सत्तेचे समीकरण कसं जुळणार?
Tamil Nadu: टीव्हीकेला १०८ जागा मिळाल्या असून, बहुमतासाठी लागणार ११८ आकडा

Tamil Nadu: देशातील पाच राज्यातील निवडणूकांच्या निकालात भाजपला तीन राज्यांमध्ये मोठे यश मिळाले. आसाम, पुदुचेरीमध्ये भाजपने यश मिळवले. तर पश्चिम बंगालमध्ये भाजपाने पहिल्यांदाच ममता बॅनर्जी यांचा गड भेदत यश मिळवले.
दुसरीकडे तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाने सगळ्यांनाच आश्चर्यचकीत केले. थलापती विजय यांच्या एका नव्या पक्षाला १०८ जागा मिळाल्या आहेत. तामिळनाडूमधील प्रस्थापित पक्षांना धक्का देत वर्षभरापूर्वीच स्थापन झालेल्या टीव्हीके पक्षाने आपल्या पहिल्याच निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या आहे.
काँग्रेसला सत्तेची ऑफर
परंतु याठिकाणी बहुमतापासून टीव्हीके १० जागा दूर आहेत. त्यातच विजय यांचे वडील चंद्रशेखर यांनी काँग्रेसला सत्तेची ऑफर दिली आहे. निकालानंतर विजय यांचे वडील एस चंद्रशेखर यांनी माध्यमांना सांगितले की, काँग्रेसचा एक इतिहास आणि परंपरा आहे. काँग्रेस कमकुवत का होतेय, त्याचे कारण म्हणजे सत्तेचा अभाव. दुसऱ्या पक्षाला पाठिंबा देऊन काँग्रेस आणखी कमकुवत होत आहे.
ती सत्ता आम्ही काँग्रेसला देऊ. विजय देण्यासाठी तयार आहे. जर तुम्हाला ती सत्ता मिळत असेल तर काँग्रेस त्यांचा इतिहास आणि वारसा वाचवू शकते. या संधीचा त्यांनी वापर करायला हवा, “अशी ऑफरच त्यांनी दिली.
काय आहे सत्तेचे समीकरण?
टीव्हीकेला १०८ जागा मिळाल्या असून, बहुमतासाठी लागणारा ११८ आकडा गाठायला विजय यांना आणखी एका पक्षाची गरज लागणार आहे. डीएमकेसोबत ते सत्तेत जाणार नाहीत कारण त्यांच्याविरोधात रागाचा वापर करून टीव्हीके सत्तेकडे वाटचाल करत होता.
विजय यांच्या वडिलांना काँग्रेससोबत आघाडी करायची आहे. सध्याचे तामिळनाडूत डिएमकेजवळ ५९ जागा आहेत. तर काँग्रेसला ५, भाकप, माकप आणि व्हिसीके पक्षाचे प्रत्येकी दोन असे ११ आमदार आहेत. जे एकत्र आल्यास बहुमताचा आकडा गाठला जाऊ शकतो.
विजय यांचे राज्यपालांना पत्र
दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर विजय यांनी आता थेट सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना पत्र लिहून विजय यांनी आपल्याला सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करण्याची विनंती राज्यपालांना पत्र लिहिले आहे.
राज्यपालांना पाठवलेल्या या पत्रात विजय यांनी आत्मविश्वास व्यक्त केला आहे. “आमच्या पक्षाकडे पुरेसे संख्याबळ असून, आम्हाला सरकार स्थापनेची संधी देण्यात यावी. आम्ही पुढील दोन आठवड्यांच्या आत विधानसभेत आमचे बहुमत सिद्ध करून दाखवू,” असे विजय यांनी पत्रात नमूद केले आहे.
विजय यांच्या या निर्णयामुळे तामिळनाडूतील सत्ता स्थापनेचा खेळ सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता राज्यपाल राजेंद्र आर्लेकर या पत्रावर काय निर्णय घेतात आणि विजय यांना शपथविधीसाठी कधी बोलावतात, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :






