Isha Ambani: “मेट गाला २०२६ मध्ये ईशा अंबानीचा रॉयल अंदाज; सोन्याची साडी आणि डायमंड ब्लाउजने जगाचं लक्ष वेधलं!”
Isha Ambani ईशाच्या लूकमधील सर्वात आकर्षक भाग म्हणजे तिचा डायमंड ब्लाउज होता. या ब्लाउजमध्ये १८०० कॅरेटपेक्षा जास्त हिरे, पन्ना, पोल्की आणि कुंदन जडवण्यात आले होते. विशेष म्हणजे हा ब्लाउज तिची आई नीता अंबानी यांच्या ज्वेलरी कलेक्शनमधून तयार करण्यात आला होता.

Isha Ambani: जगातील सर्वात प्रतिष्ठित फॅशन इव्हेंट मानल्या जाणाऱ्या मेट गाला २०२६ मध्ये भारतीय उद्योजिका ईशा अंबानी (Isha Ambani) हिने आपल्या शाही लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिचा हा लूक केवळ फॅशनपुरता मर्यादित नव्हता, तर भारतीय परंपरा, कला आणि आधुनिकतेचा सुंदर संगम दाखवणारा होता.
ईशा अंबानीने या इव्हेंटसाठी प्रसिद्ध डिझायनर गौरव गुप्ता यांनी डिझाइन केलेली खास साडी परिधान केली होती. ही साडी शुद्ध सोन्याच्या धाग्यांनी विणलेली होती. या साडीत पारंपरिक कलेचे सुंदर मोटिफ्स आणि मॉडर्न केप यांचा अनोखा मेळ पाहायला मिळाला. ही साडी तयार करण्यासाठी ५० पेक्षा जास्त कारागिरांनी तब्बल १२०० तास मेहनत घेतली होती, त्यामुळे तिचं विशेष महत्त्व वाढलं.
ईशाच्या लूकमधील सर्वात आकर्षक भाग म्हणजे तिचा डायमंड ब्लाउज होता. या ब्लाउजमध्ये १८०० कॅरेटपेक्षा जास्त हिरे, पन्ना, पोल्की आणि कुंदन जडवण्यात आले होते. विशेष म्हणजे हा ब्लाउज तिची आई नीता अंबानी यांच्या ज्वेलरी कलेक्शनमधून तयार करण्यात आला होता. ब्लाउजच्या डिझाइनमध्ये निजामकालीन सरपेचपासून प्रेरणा घेतली गेली होती, ज्यामुळे त्याला आणखी शाही लूक मिळाला. (Isha Ambani)

Isha Ambani
ईशाच्या लूकमधील आणखी एक खास आकर्षण म्हणजे तिची ‘मॅंगो पर्स’. ही पर्स प्रसिद्ध कलाकार सुबोध गुप्ता यांनी तयार केलेल्या आंब्याच्या शिल्पावर आधारित होती. ही पर्स क्रोशे बॅगमध्ये कॅरी करण्यात आली होती. या अनोख्या अॅक्सेसरीने भारतीय संस्कृती आणि कलेचं प्रतिनिधित्व केलं आणि ‘फॅशन इज आर्ट’ या थीमला साजेसं रूप दिलं.
याशिवाय, ईशाने डायमंड नेकलेस, हातफूल आणि कमरबंद यांसारख्या दागिन्यांनी आपला लूक पूर्ण केला. तिच्या हेअरस्टाईलमध्ये चमेलीपासून प्रेरित गजऱ्याचाही समावेश होता, जो कागद, तांबे आणि पितळ यांसारख्या साहित्यांपासून तयार करण्यात आला होता. त्यामुळे पारंपरिक आणि आधुनिक फॅशनचा सुंदर संगम तिच्या लूकमध्ये दिसून आला.
ईशा अंबानीचा हा लूक केवळ स्टाईल स्टेटमेंट नव्हता, तर भारतीय कारागिरी, परंपरा आणि संस्कृतीचं जागतिक प्रदर्शन ठरला. दरवर्षी मेट गालामध्ये भारताची उपस्थिती अधिक ठळक होत असून, यंदा ईशाने ती आणखी उंचावली. तिच्या या शाही अंदाजामुळे भारतीय फॅशनला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली आहे.





