Tamil Nadu : मदुराईमध्ये हिंदू मक्कल काची संघटनेच्या नेत्याची हत्या

मदुराई – तामिळनाडूतील मदुराईमध्ये एका हिंदुत्ववादी संघटनेच्या नेत्याची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मणिकंदन (41) असे हत्त्या झालेल्या नेत्याचे नाव असून तो हिंदू मक्कल काची संघटनेचा पदाधिकारी आहे. ही घटना 31 जानेवारी रोजी घडली असून अद्याप मारेकऱ्यांची ओळख पटलेली नाही. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.
मणिकंदन हिंदू मक्कल काची दक्षिण मदुराईचे उपसचिव होते आणि मदुराईच्या एमके नगरमध्ये ते दागिन्यांचे दुकान चालवत होते. मंगळवारी रात्री ते दुकान बंद करून घरी परतत होते.
दरम्यान, काही लोकांच्या जमावाने त्याच्यावर मागून चाकू, विळा, दगडाने हल्ला केला. अमानुष मारहाण केल्यानंतर आरोपींनी मणिकंदनला जखमी अवस्थेत सोडून घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर मणिकंदनला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/nagpur-mlc-election-sudhakar-adbale-won-from-nagpur/
मदुराईच्या जयहिंदपुरम पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या हत्येमागे राजकीय किंवा वैयक्तिक वैमनस्य आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपींची ओळख अद्याप पटलेली नाही. सध्या पोलीस आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.





