चेन्नई :- तामिळनाडुतील सत्ताधारी द्रमुकच्या युवा शाखेचे सचिव आमदार उदयनिधी स्टॅलिन यांचा राज्यमंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. राज्यपाल आर एन रवी यांनी त्यांना मंत्रीपदाची शपथ दिली. त्यांना युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्याखेरीज त्यांच्याकडे कार्यक्रम अंमलबजावणी आणि गरीबी निमुर्लन ही खातीही देण्यात आली आहेत.
ते मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आहेत. त्यांच्या समावेशावर घराणेशाहीचा आरोप केला गेला असला तरी हा आरोप ते आपल्या चकमकदार कामगीरीने पुसुन टाकतील असा विश्वास मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी व्यक्त केला आहे. या समावेशानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांचा खांदेपालटही केला.
Ban Smoking : ‘या’ देशात 2008 नंतर जन्मलेल्यांना आजीवन धुम्रपानास बंदी
शपथविधीनंतर पत्रकारांशी बोलताना उदयनिधी म्हणाले की, आपण यापुढे चित्रपटांमध्ये काम करणार नाही आणि मारी सेल्वाराज दिग्दर्शित ‘मामन्नन’ हा आपला शेवटचा चित्रपट असेल. मंत्रीपदासाठी आपल्याला अभिनेता-निर्माता कमल हसन यांच्याकडून चित्रपटात काम करण्याची ऑफर नाकारावी लागली, असे त्यांनी नमूद केले.