Tamil Nadu Assembly Elections: दक्षिण भारतात चित्रपटसृष्टी आणि राजकारण यांचं नातं खूप जुन आहे. अनेक सुपरस्टार्सनी पडद्यावरून थेट राजकारणात उडी घेतली आणि मोठी यशस्वी कारकीर्दही घडवली. तमिळनाडू विधानसभा निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे अनेकांना वाटतं की जयललिता या पहिल्या अभिनेत्री होत्या ज्या मुख्यमंत्री बनल्या, पण प्रत्यक्षात तसं नाही. Tamil Nadu Assembly Elections सर्वात आधी अभिनेता ते मुख्यमंत्री असा प्रवास करणारे होते एम जी रामचंद्रन. १९७७ साली ते तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनले आणि त्यांनी १९८७ पर्यंत राज्य केलं. त्यांनी स्थापन केलेल्या अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (एआयएडीएमके) पक्षामुळे त्यांना मोठा जनाधार मिळाला. त्यांच्या काळात सुरू झालेली मध्यान्ह भोजन योजना खूप प्रसिद्ध झाली. जयललिता यांचं नावही या यादीत खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी सिनेमा क्षेत्रात मोठं यश मिळवल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. एम जी रामचंद्रन यांच्या निधनानंतर त्यांनी पक्षाची सूत्रं हाती घेतली आणि १९९१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्या. त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले, पण त्यांनी तमिळनाडूच्या राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र त्यांच्याआधी एम जी रामचंद्रन यांच्या पत्नी वी एन जानकी यांनी अल्पकाळासाठी मुख्यमंत्री पद भूषवलं होतं. तेलुगू सिनेमा जगतातील दिग्गज अभिनेता एन टी रामाराव यांनीही राजकारणात मोठं नाव कमावलं. त्यांनी १९८२ मध्ये तेलुगू देशम पक्ष स्थापन केला आणि काही महिन्यांतच मुख्यमंत्री बनले. ते तीन वेळा मुख्यमंत्री राहिले. Tamil Nadu Assembly Elections: दक्षिणेत कलाकारांची राजकीय परंपरा; विजय करणार का कमाल? रजनीकांत हे सुद्धा मोठं नाव आहे. त्यांनी राजकारणात येण्याचे संकेत दिले होते आणि काही राजकीय भूमिका मांडल्या होत्या, पण अखेरीस त्यांनी सक्रिय राजकारणात येण्याचा निर्णय मागे घेतला. त्यांच्या चाहत्यांना मात्र आजही त्यांच्या राजकीय एंट्रीची अपेक्षा आहे. (Tamil Nadu Assembly Elections) कमल हसन यांनी ‘मक्कल नीधि मय्यम’ हा पक्ष सुरू करून राजकारणात प्रवेश केला. त्यांनी निवडणुका लढवल्या आणि सध्या ते तमिळनाडूच्या राजकारणात सक्रिय आहेत. विजयकांत यांनीही स्वतःचा पक्ष स्थापन करून निवडणुका लढवल्या आणि काही प्रमाणात यशही मिळवलं. ते एकेकाळी विरोधी पक्षनेते होते. आंध्र प्रदेशात पवन कल्याण यांनी ‘जन सेना पार्टी’ स्थापन करून राजकारणात उडी घेतली. २०२४ च्या निवडणुकीत त्यांनी चांगलं यश मिळवलं आणि उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. (Tamil Nadu Assembly Elections) आता सगळ्यांच्या नजरा थलपती विजय यांच्यावर आहेत. त्यांनी २०२४ मध्ये ‘तमिळगा वेट्री कळघम’ या पक्षाची स्थापना करून अधिकृतपणे राजकारणात प्रवेश केला. याआधीही ते समाजकार्यात सक्रिय होते. आता ते विधानसभा निवडणुकीत उतरले असून त्यांच्या राजकीय भवितव्याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. एकूणच, दक्षिण भारतात सिनेमा आणि राजकारण यांचा संगम नवा नाही. अनेक कलाकारांनी जनतेचा पाठिंबा मिळवत सत्ता मिळवली आहे. आता विजय यांच्या बाबतीतही तेच चित्र दिसेल का, हे येणारा काळच ठरवेल.