तमिळ चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री 12 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत करणार विवाह; लग्नाची तारीखही सांगितली

Vishal Krishna And Sai Dhanshika | तमिळ अभिनेता विशाल कृष्णाच्या मागील काही दिवसांपासून लग्नाच्या चर्चा समोर येत आहे. अखेर अभिनेत्याने स्वतः याची पुष्टी केली आहे. लवकरच विशाल कृष्णा अभिनेत्री साई धनशिकासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. या दोघांनी ‘योगी दा’ या चित्रपटाच्या ऑडिओ लॉंच इव्हेंटमध्ये त्यांच्या लग्नाची तारीखही जाहीर केली आहे. मात्र दोघांमधील वयाचा फरकही चर्चेचा विषय बनला आहे.
सई आणि विशाल या दोघांच्या वयात सुमारे 12 वर्षांचं अंतर आहे. 47 वर्षांचे विशाल 29 ऑगस्ट रोजी त्यांच्या वाढदिवसाला 48 वर्षांचे होणार आहेत. वाढदिवसाच्या दिवशी ते लग्नबंधनात अडकणार आहेत. तर 20 नोव्हेंबर 1989 रोजी जन्मलेल्या साई धनशिकाचे वय 35 वर्षे आहे. अनेक दिवसांपासून या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरु होती. आता विशाल आणि सई यांनी लग्नाची अधिकृत घोषणा केल्याने उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
विशाल कृष्णा तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने ‘मध गजा राजा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे आणि तमिळ फिल्म प्रोड्यूसर्स कौन्सिलचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. साई धंशिका ही ‘कबाली’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी ओळखली जाते, ज्यात तिने सुपरस्टार रजनीकांत यांच्या मुलीची भूमिका केली होती. तमिळ व्यतिरिक्त, सईने धनशिका यांनी ‘शिकारू’, ‘अंतिया तीर’ आणि ‘दक्षिणा’ यांसह अनेक तेलुगु चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. Vishal Krishna And Sai Dhanshika |
विशाल आणि साई धनशिका अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात आणि दोघे चांगले मित्र आहेत. त्यांनी कधीही त्यांच्या नात्याची कबुली दिली नव्हती. आता दोघांनी त्यांच्या लग्नाची घोषणा करून चाहत्यांना चकित केले आहे. सध्या चाहत्यांकडूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. Vishal Krishna And Sai Dhanshika |
हेही वाचा:





