ताम्हिणी घाटात प्लास्टिक मुक्त मोहीम; 140 कार्यकर्त्यांचा मोहीमेत सहभाग

ताम्हिणी घाट : संत गाडगे महाराज जयंती निमित्त २३ फेब्रुवारी २०२५ रोजी ताम्हिणी ते गरुड माची असा अंदाजे 15.5 किलोमीटर रस्ता स्वच्छ करण्यात आला. 140 कार्यकर्ते या मोहिमेत सामील होते. अंदाजे ७०० किलो प्लास्टिक व काचेचा कचरा जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली. प्रमुख मार्गदर्शन गरुड माचीचे सिद्ध लेखक वसंत वसंत लिमये यांचे लाभले.
उपक्रमाची सुरुवात संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर अंकुश भाऊ मोरे यांनी प्रास्ताविक केले व उपक्रमाची माहिती दिली. वन विभाग, महाराष्ट्र शासनचे रेंज फोरेस्ट ऑफिसर समीर इंगळे, सोनकांबळे व नरवडे यांचे उपक्रमास सहकार्य मिळाले. यावेळी पौड पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर श्री गिरीगोसावी साहेब सहकार्य लाभले व त्यांनी उपक्रमाचे कौतुक केले. आदिशक्ती युवा केंद्रचे संस्थापक पोलीस इन्स्पेक्टर संतोष भूमकर साहेब, कार्यक्रमाची सांगता करताना म्हणाले की, हा उपक्रम असाच चालू ठेवू, आभार मानून थांबायचे नाही.
या उपक्रमात सरदार यशवंत महादेव पोतनीस ट्रस्ट, आदिशक्ती युवा प्रेरणा केंद्र, गरुड माची, तुळजा भवानी ट्रस्ट, श्री रोहन संजीव देशपांडे, विंझाई माता शाळा, भारत विकास परिषद, महाराष्ट्र शासन वन विभाग, पौड पोलीस स्टेशन, अंकुश भाऊ मोरे, Helplast Bioplastics Private Limited संस्थांचे सहकार्य लाभले. तर सर्व कार्यकर्त्यांची चहा नाश्ता व भोजनाची व्यवस्था विंझाई माता शाळेच्या विद्यार्थ्यांनी केली होती.
या उपक्रमाद्वारे कोणीही रस्त्यावर अथवा वन क्षेत्रात कचरा टाकू नये. तसेच आपल्या भागात असे उपक्रम राबवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
हेही वाचा:





