Actress Tamannaah Bhatia : २०१५ साली आलेल्या बाहुबली या चित्रपटाने सिनेविश्वात एक नवा अध्याय रचला. या चित्रपटात अभिनेत्री तमन्ना भाटियाने महत्वाची भूमिका साकारलेली आहे. तिच्या भूमिकेचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. मात्र, अभिनेता प्रभास आणि तिच्यावर चित्रित करण्यात आलेल्या गाण्यावर बरीच चर्चा झाली होती. नुकतेच एका मुलाखतीत तिने याबाबत मोठा खुलासा केला आहे. तमन्नाने या चित्रपटात अवंतिका हे पात्र साकारलेले आहे. या चित्रपटातील सर्वच गाणी हिट ठरली. प्रभास आणि तिच्यावर ‘पंछी बोल ये क्या’ हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं. प्रेक्षकांनाही हे गाणं प्रचंड आवडलं. मात्र, यातील काही गोष्टींमुळे वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. ‘अवंतिका का रेप’ म्हणून एक आर्टिकल देखील छापण्यात आलं होतं. यावर अखेर अभिनेत्री तमन्नाने मौन सोडलं असून मोठा खुलासा केला आहे. यामुळे तिने केलेल्या वक्तव्याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. जे लोक तुम्हाला नियंत्रित करू शकत नाहीत, अशा परिस्थितीत ते एका वेगळ्या टेक्निकचा वापर करतात आणि ती टेक्निक म्हणजे लाज आणि अपराधीपणाची भूमिका… कारण ते नेहमीच तुम्हाला असं वाटायला लावतात की तुम्ही जे काही करत आहात त्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे, जेव्हा तुम्हाला लाज वाटू लागते, तेव्हा अशी लोकं तुमच्यावर नियंत्रण मिळवू शकतात. ‘ असं तमन्ना म्हणाली आहे. पुढे तमन्ना म्हणाली, ” सेक्स वाईट असेल तर आपण या जगात नसतो… आपण काहीतरी चूक केली आहे याची आपल्याला लाज वाटायला लावली जाते. आपण इतके दबलेले आहोत. चित्रपटातील दिग्दर्शकाचा दृष्टिकोन लोकांना का समजत नाही”, असा संतप्त सवाल तिने यावेळी बोलताना उपस्थित केला. हेही वाचा : सर्वोच्च न्यायालयाचा सर्वसामान्यांना झटका ; वीजदर वाढीबाबत मोठा निर्णय, देशभरात दर वाढणार?