विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नाने सोडलं मौन

Tamannaah Bhatia on Virat Kohli | अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या खासगी आयुष्यामुळे सातत्याने चर्चेत राहिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती अभिनेता विजय वर्माला डेट करत होती. पण या दोघांचेही ब्रेकअप झाले आहे. विजयच्या आधी तमन्नाचं नाव भारतीय क्रिकेटर विराट कोहली, पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रझाक यांच्याशीही जोडलं गेलं होतं. याबाबत तिने एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला आहे.
तो फोटो शूटिंगदरम्यानचा…
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्ना म्हणाली, “मला फार वाईट वाटतं. कारण मी त्याला फक्त एकदाच शूटिंगनिमित्त भेटली होती. शूटिंगनंतर आम्ही पुन्हा कधी भेटलो नाही. आमचं फार कधी बोलणंही झालं नव्हतं. आमचा जो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, तो त्या शूटिंगदरम्यानचा होता. आम्ही त्यात फक्त कामाविषयी एकमेकांशी बोलत होतो. परंतु लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला.”
दरम्यान, तमन्ना आणि विराट यांनी एका जाहिरातीत एकत्र काम केलं होतं. 2010 च्या सुरुवातीला ही शूटिंग झाली होती आणि सेटवरील दोघांचा एक फोटो व्हायरल झाला होता. विराट कोहली शिवाय तमन्ना भाटियाचे नाव पाकिस्तानी माजी क्रिकेटर अब्दुल रझाकशी देखील जोडले गेले होते. अब्दुलसोबत तिने गुपचूप लग्न उरकले अशा बातम्याही आल्या होत्या. दोघेही एका ज्वेलरी स्टोअरमध्ये दिसले होते, त्यानंतर या बातम्यांना उधाण आले. त्याबाबतही तमन्नाने मौन सोडले आहे. Tamannaah Bhatia on Virat Kohli |
अब्दुल रझाकशी लग्न केलं होतं, पण…
त्यावर तमन्ना म्हणाली, “इंटरनेटवर विश्वास ठेवला तर मी थोड्या वेळासाठी अब्दुल रझाकशी लग्न केलं होतं. मला माफ करा, त्यांची दोन-तीन मुलं आहेत. त्यांच्या आयुष्याबद्दल मला काहीच माहीत नाही. परंतु या अफवा अत्यंत लज्जास्पद आहेत. आमचा जो फोटो व्हायरल झाला होता, तो एका ज्वेलरी स्टोअरच्या लाँचदरम्यानचा होता. त्याठिकाणी आम्ही दोघं योगायोगाने एकत्र उपस्थित होतो.”
“अशा अफवांना तोंड देणे कठीण असते. जेव्हा तुमचा त्या व्यक्तीशी काहीही संबंध नसतो आणि तरीही लोक अफवा पसरवतात तेव्हा ते खूप विचित्र असते. पण तुम्ही काहीही करू शकत नाही. तुम्ही काहीही करू शकत नाही हे गोष्टसुद्धा स्वीकारण्यास वेळ लागतो. तुम्ही बसून कोणावरही नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यामुळे या गोष्टींकडे मी आता विनोदाच्या दृष्टीकोनातून बघते”, असं तिने स्पष्ट केलं. Tamannaah Bhatia on Virat Kohli |
तमन्ना भाटियाने हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. 2015 मध्ये ‘बाहुबली : द बिगनिंग’ या चित्रपटामुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली होती. Tamannaah Bhatia on Virat Kohli |
हेही वाचा :
Pune crime : पीएसआय कामठेचा माझ्या शरीराला विकृतपणे स्पर्श; तरुणीच्या आरोपाने पुणे पोलीस अडचणीत?





