तमन्ना भाटियाचा स्टाइलिश लुक; पाहा PHOTOS

Tamannaah Bhatia PhotoShoot | अभिनेत्री तमन्ना भाटियाने बॉलीवूड आणि दक्षिण चित्रपटसृष्टीत स्वतःच्या अभिनय आणि टॅलेंटने यशस्वीपणे आपले स्थान निर्माण केले आहे. भारतासह परदेशातही तिचा मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर देखील तमन्ना सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच तिने इनस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यातील तिचा स्टाइलिश अनेकांच्या पसंतीस पडला आहे.
तमन्ना भाटियान शेअर केलेल्या या फोटोमधील तिचा लूक चांगलाच चर्चेत आहे. तिनं धोती, ब्रालेट आणि ब्लेजर परिधान केले आहे. तमन्नानं तिच्या या स्टायलिश लूकला पूर्ण करण्यासाठी गोल्डन हाय हील्स कॅरी केले आहेत. यात तिने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत. सध्या तिच्या या फोटोवर चाहत्यांचा लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
तमन्नाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तमन्नाचा ‘अरनमनई 4’ हा चित्रपट चर्चेत असून या चित्रपटाने तेलगू आणि तमिळ भाषेत 100 कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केले आहे. हा चित्रपट लवकरच हिंदीतही प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:





