‘बिब्बोजानने’ प्लास्टिक सर्जरी केली का ?

अभिनेत्री अदिती राव हैदरी सध्या ‘हिरामंडी’मुळे चर्चेत आहे. अदितीच्या ‘बिब्बोजान’ या व्यक्तिरेखेला खूप प्रेम मिळत आहे. चित्रपटातील व्हायरल झालेल्या ‘गज गामिनी’ वॉकला लोकांनी खूप कॉपी करण्याचा प्रयत्न केला.
अशात अदितीच्या अभिनयाचे सुद्धा चाहताकडून कौतुक केले जात आहे.तर तिचे काही जुने फोटोही सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. अदितीचे अनेक जुने फोटो सोशल मीडियावर समोर आले आहे, ज्यामध्ये अदिती पूर्णपणे ओळखता येत नाही.
अदितीचा मागील अठरा वर्ष जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे फोटो त्यावेळचे आहे जेव्हा तिने नुकतेच इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला होता आणि इंडस्ट्रीत तिच्या करिअरला सुरुवात केली होती. जुने फोटो आणि आजचे फोटो पाहून चाहते संभ्रमात पडले आहे. अभिनेत्रीने प्लास्टिक सर्जरी केली आहे का? असा प्रश्न सर्वच विचारत आहे.
खरं तर, व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये अदितीचे नाक, ओठ आणि अगदी गाल खूप वेगळी दिसत आहे, त्यामुळे अदितीने तिचा लूक बदलण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केल्याची चर्चा लोकांमध्ये सुरू झाली आहे. लोक अदितीचे नवीन आणि जुने फोटो शेअर करत आहे. तिच्या लूकमधील फरकाची तुलना करत आहे. एकीकडे आदितीचे हे रूपांतर काही लोकांसाठी आश्चर्याचा विषय ठरले आहे, तर अनेकांचे म्हणणे आहे की, अभिनेत्रीने प्लास्टिक सर्जरी केली आहे. ज्याद्वारे तिचे नाक आणि ओठांना आकार दिला आहे. या चर्चांवर मात्र ‘बिब्बोजानने’कुठलेही प्रतिक्रिया दिलेली नाही.
2006 मध्ये करिअरला सुरुवात केली
अदितीने 2006 मध्ये ‘प्रजापती’ मधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. हा एक मल्याळम चित्रपट होता, ज्यामध्ये सुपरस्टार मामूट्टी मुख्य भूमिकेत दिसला होता. आदितीच्या बॉलीवूड पदार्पणाबद्दल सांगायचे तर, अभिनेत्रीने सुरुवातीला 2011 मध्ये सुरू झालेल्या ‘ये साली जिंदगी’मधून तिच्या करिअरची सुरुवात केली. यानंतर, ती रणबीर कपूर स्टारर रॉकस्टार, हॉरर फिल्म मर्डर 3, वजीर आणि पद्मावत सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्री म्हणून दिसली.





