तमन्ना भाटिया वाढलेल्या वजनामुळे ट्रोल

Tamannaah Bhatia | अभिनेत्री तमन्ना भाटियाचे ‘स्त्री 2’ मधील आयटम साँग चांगलेच गाजले. यातील तिच्या स्टाइल आणि अदांनी सर्वांच घायाळ केले. मात्र सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात तमन्नाच्या लूकमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
तमन्ना भाटिया फिटनेस आयकॉन तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र व्हायरल व्हिडीओमध्ये ती कटआऊट बॅकलेस टॉप आणि जीन्समध्ये दिसत आहे. यावेळी तमन्नाही मीडियाला पाहताच कॅमेऱ्यासमोर पोझ देते. या व्हिडीओमध्ये तमन्ना भाटियाचं वजन थोडंस वाढलेलं असल्याचं दिसत आहे. यावरून आणि तिच्या कपड्यांच्या निवडीमुळे नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.
View this post on Instagram
नेटकऱ्यांनी कमेंट करत लिहिले की, ‘ती खूप लठ्ठ दिसत आहे,’ ‘शरीर रचनेनुसार ड्रेसिंग खूपच खराब आहे’, ‘तिचा जिम ट्रेनर त्याला WWE मध्ये घेऊन जाण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे’, ‘WWE मध्ये एन्ट्री पक्की’. मात्र, काही चाहते तिच्या समर्थनात पुढे आले आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलंय, तमन्ना प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते. तर दुसऱ्याने लिहिले, ‘ती लठ्ठ झाली आहे, पण तमन्ना अजूनही सुंदर आहे.’
तमन्नाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झाले तर, विजय वर्मा आणि तमन्नाने काही महिन्यांपूर्वीच माध्यमांसमोर जाहीरपणे एकमेकांबद्दलचं प्रेम कबुल दिली आहे.





