तमन्ना भाटियाचे दोनदा झाले ब्रेकअप; स्वत: केला खुलासा

Tamannaah Bhatia | अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या विजय वर्माला डेट करत आहे. नुकतेच तिने पॉडकास्टमध्ये रिलेशनशिपवर भाष्य केले आहे. याशिवाय तिचे दोनदा ब्रेकअप झाल्याचे देखील तिने सांगितले आहे.
तमन्ना म्हणाली की, “माझे वय जेव्हा कमी होते, त्यावेळी जर मला कोणी भेटवस्तू द्यायचा प्रयत्न केला तर मला फार राग यायचा. मला असे वाटायचे की ते काहीतरी करू शकतात, हे दाखवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. ते नात्यावर पैशांचा टॅग लावत आहे, असे वाटायचे,” असं तमन्ना म्हणाली. Tamannaah Bhatia |
पुढे ती म्हणाली, “आपल्या जोडीदाराला बदलण्याचा प्रयत्न केला तर ते एखाद्यावर नियंत्रण ठेवल्यासारखे होईल आणि कोणत्याही नात्यात हा सर्वात मोठा धोका असतो. जी व्यक्ती खोटं बोलते तिच्याबरोबर अजिबात राहू नका. विशेषत: जे अगदी छोट्या गोष्टींसाठी खोटं बोलतात. कोणीही आपल्या पार्टनरला बदलण्याचा किंवा आपण आहोत तसंच बनवण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे. यामुळे तुम्ही त्याला कंट्रोलमध्ये ठेवल्यासारखे होते.” Tamannaah Bhatia |
“मी पार्टनरला समजून घेणारी आहे. आपल्या पार्टनरला कोणती गोष्ट वाईट वाटेल हे आपल्याला माहित असतं. त्यामुळे तसं काही न वागण्याचा मी प्रयत्न करते. पहिल्यांदा माझ्यासोबत कमी वयात असताना असं झालं जेव्हा मी पार्टनरसाठी सगळ्या गरजा आणि इच्छा सोडायला तयार होते. मला आणखी एक्स्पोअर करायचं होतं. दुसऱ्यांदा हार्टब्रेक झालं तेव्हा मला जाणीव झाली की तो माझ्या आयुष्यात आणखी प्रभाव टाकू शकणार नाही.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “माझ्या भूतकाळातील रिलेशनशिपबद्दल बोलायचे तर, मला जे माझ्या जोडीदारामध्ये पाहिजे, ते मी स्वत:मध्ये आणण्याचा प्रयत्न करायचे. पुढची व्यक्ती मी जे करतेय ते स्वीकारण्याच्या मनस्थितीत आहे की नाही हे न बघताच मी फक्त करत राहायचे. यामुळे एक वेगळ्या प्रकारचे वाईट नाते तयार होते. पण नंतर मला समजत गेले की नाते हे दोन्ही बाजूंनी असायला हवे. हे मी माझ्या भूतकाळातील दोन नात्यांमधून शिकले आहे.”
हेही वाचा:
“रेड टाकून मला अटक करण्याचा प्रयत्न…”; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल





