Giorgia Meloni Narendra Modi : पुन्हा रंगली ‘मेलॉडी’ची चर्चा.! मेलोनींच्या पंतप्रधान मोदींना खास शुभेच्छा, काय म्हणाल्या एकदा पाहाच….
Giorgia Meloni Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यातील मैत्रीपूर्ण संवाद सोशल मीडियावर अनेकदा चर्चेचा विषय ठरला आहे. दोघांच्या नावांवरून तयार झालेला 'Melodi' हा हॅशटॅग जगभरात लोकप्रिय झाला होता.

Giorgia Meloni | Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सलग पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाबाबत एक महत्त्वाचा टप्पा गाठल्याच्या पार्श्वभूमीवर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत मेलोनी यांनी मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले आणि भारत-इटली संबंध अधिक दृढ करण्याचा विश्वास व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये प्रथमच देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर २०१९ आणि २०२४ मध्येही त्यांनी विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन केली. या दीर्घ कार्यकाळामुळे ते भारताच्या राजकीय इतिहासातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक मानले जात आहेत. (Giorgia Meloni Narendra Modi)
मेलोनींची खास पोस्टजॉर्जिया मेलोनी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. भारताच्या
नेतृत्वात त्यांनी गाठलेला हा महत्त्वाचा टप्पा उल्लेखनीय आहे.” यासोबतच त्यांनी काही आठवड्यांपूर्वी रोममध्ये झालेल्या दोन्ही नेत्यांच्या भेटीचाही उल्लेख केला.
Congratulazioni a @narendramodi che oggi diventa il Primo Ministro eletto più longevo nella storia dell’India.
È stato un piacere ritrovarci a Roma nelle scorse settimane e lanciare assieme un Partenariato Strategico Speciale che guarda al futuro per creare nuove opportunità… pic.twitter.com/hiQICM6eKV
— Giorgia Meloni (@GiorgiaMeloni) June 10, 2026
मेलोनी म्हणाल्या की, “रोममध्ये पुन्हा एकदा भेटणे आणि भारत-इटली विशेष धोरणात्मक भागीदारीला नवी दिशा देणे हा एक उत्कृष्ट अनुभव होता. या सहकार्यामुळे दोन्ही देशांच्या जनतेसाठी विकासाच्या आणि प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध होतील.”
भारत-इटली संबंधांना नवी गती (Giorgia Meloni Narendra Modi)
अलीकडच्या काळात भारत आणि इटली यांच्यातील संबंध अधिक मजबूत होताना दिसत आहेत. व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि गुंतवणूक यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमधील सहकार्य वाढत आहे. रोममध्ये झालेल्या चर्चांदरम्यानही या संबंधांना अधिक व्यापक स्वरूप देण्यावर भर देण्यात आला.
‘Melodi’ ची सोशल मीडियावर चर्चा (Giorgia Meloni Narendra Modi)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यातील मैत्रीपूर्ण संवाद सोशल मीडियावर अनेकदा चर्चेचा विषय ठरला आहे. दोघांच्या नावांवरून तयार झालेला ‘Melodi’ हा हॅशटॅग जगभरात लोकप्रिय झाला होता.
अलीकडील इटली दौऱ्यात मोदी यांनी मेलोनी यांना भारतातील प्रसिद्ध ‘Melody’ चॉकलेट भेट दिल्याचीही चर्चा रंगली होती. सोशल मीडियावरील या हलक्याफुलक्या क्षणांमुळे दोन्ही नेत्यांमधील मैत्री आणि भारत-इटली संबंधांबाबत सकारात्मक संदेश पोहोचल्याचे मानले जाते.
मेलोनी यांच्या ताज्या शुभेच्छा संदेशामुळे भारत आणि इटली यांच्यातील वाढत्या सहकार्याला आणखी बळ मिळाल्याचे मानले जात असून, दोन्ही देश आगामी काळात विविध क्षेत्रांत अधिक जवळून काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





