Afghanistan : अफगाणिस्तानातील स्फोटात तालिबानी मंत्री ठार
Updated On:

Afghanistan – अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये झालेल्या आत्मघातकी स्फोटात तालिबान राजवटीतील निर्वासितांसाठीचा मंत्री आणि अन्य दोघेजण ठार झाले. तालिबानचा प्रभाव असलेल्या भागात तालिबानी मंत्र्यालाच स्फोटाने लक्ष्य करण्यात आल्याची घटना प्रथमच घडली आहे.
हा स्फोट मंत्रालयाच्या आत झाला आणि त्यात खलिल हक्कानी या मंत्र्याचा मृत्यू झाला. खलिल हक्कानी हा तालिबानमधील नेटवर्कचे नेतृत्व करणारा प्रभारी गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी याचा काका होता.
या स्फोटाची जबाबदारी तातडीने स्वीकारण्यात आलेली नाही. मात्र सत्ताधारी तालिबानचा प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या इस्लामिक स्टेट गटाच्या सहयोगी संघटनेने यापूर्वी अफगाणिस्तानात असे हल्ले केले आहेत.





