Marathi Actor : मराठी सिनेसृष्टीवर शोककळा! हरहुन्नरी तरुण अभिनेत्याचं निधन, अवघ्या 38 व्या वर्षी अकाली एक्झिट
Marathi Actor : मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीतून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. हरहुन्नरी अभिनेते ऋषिकेश कानडे यांचे सोमवारी (3 ऑगस्ट) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.

Marathi Actor : मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीतून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. हरहुन्नरी अभिनेते ऋषिकेश कानडे यांचे सोमवारी (3 ऑगस्ट) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. (Marathi Actor)
ऋषिकेश कानडे यांनी आपल्या दमदार अभिनयाने रंगभूमीवर वेगळी ओळख निर्माण केली होती. देशभक्तीपर ‘मी भारतीय’ या नाटकाच्या जवळपास 300 प्रयोगांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली. (Marathi Actor)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर व्याख्याने देताना त्यांचे इतिहासप्रेम आणि राष्ट्रभक्तीही प्रकर्षाने दिसून येत असे. प्रत्येक भूमिका ते मनापासून जगत असल्यामुळे त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची नेहमीच भरभरून दाद मिळत होती. (Marathi Actor)
अभिनय क्षेत्रातील योगदानाबद्दल ऋषिकेश कानडे यांना राज्य नाट्य स्पर्धेत सलग दोन वर्षे अभिनयाचे रौप्यपदक मिळाले होते. रंगभूमीबरोबरच ते स्वतःचा ऑनलाइन फिटनेस क्लबही चालवत होते. (Marathi Actor)
त्यांच्या पश्चात आई-वडील, बहीण आणि पत्नी असा परिवार आहे. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अकाली निधनामुळे मराठी रंगकर्मी, कलाविश्व आणि चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून, अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. (Marathi Actor)






