Talegaon Dabhade: आमदार सुनील शेळकेंची मोठी घोषणा! तळेगाव ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी २ कोटींचा निधी जाहीर
Talegaon Dabhade: मूलभूत सुविधा आणि हद्दवाढीच्या प्रस्तावासाठी तळेगाव दाभाडे ग्रामीण कृती समिती आक्रमक; नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांना निवेदन सादर.

Talegaon Dabhade – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीबाहेरील नागरी वसाहतींमध्ये रस्ते आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी दोन कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. हद्दवाढ आणि मूलभूत सुविधा मिळाव्यात, या मागणीसाठी तळेगाव दाभाडे ग्रामीण कृती समितीच्या वतीने नगरपरिषदेवर काढण्यात आलेल्या मोर्चावेळी त्यांनी ही घोषणा केली.
या मागण्यांचे निवेदन कृती समितीच्या वतीने नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील आणि मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांना देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी हद्दवाढीच्या प्रस्तावावर शासनस्तरावर तातडीने निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. कचरा संकलनाची सेवा सशुल्क स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येईल. पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन पाणीपट्टी आकारून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल.
तसेच आकार फाउंड्रीपर्यंत नगरपरिषद हद्दीतील विद्युत पुरवठा तातडीने सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान आमदार सुनील शेळके यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांची माहिती घेतली. नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर रस्त्यांच्या कामासाठी दोन कोटी रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच हद्दवाढीच्या प्रस्तावाबाबत शासनस्तरावर तातडीने पाठपुरावा करून निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, उपनगराध्यक्ष गणेश काकडे, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, सोनाली शेलार आदी सहभागी झाले होते. गणपती माळ, शिंदे वस्ती, काकडे वस्ती तसेच ठाकरवाडी (१ ते ३) या नागरी वस्त्यांना नगरपरिषदेकडून मूलभूत सुविधा व सेवा पुरवाव्यात. तसेच तळेगाव दाभाडे ग्रामीण भागाचा नगरपरिषद हद्दीत समावेश करावा,





