Talegaon Dabhade: महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलच्या उपाध्यक्षपदी अॅड.रंजना रघुनाथ भोसले यांची बिनविरोध निवड
Talegaon Dabhade: महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलच्या उपाध्यक्षपदी इतिहासात प्रथमच महिलेची निवड

तळेगाव दाभाडे – – तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा, ज्येष्ठ विधिज्ञ अँँड.रंजना रघुनाथ भोसले यांची महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलच्या उपाध्यक्षपदी इतिहासात प्रथमच महिलेची निवड झाली आहे. अँँड. भोसले गेल्या ३७ वर्षांपासून वकिलीव्यवसाय करत आहेत.या व्यवसाया बरोबर सामाजिक, शैक्षणिक आणि सार्जनिक क्षेत्रात त्यांनी दीर्घकाळ योगदान दिले आहे.
या आगोदर तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद, आरोग्य समिती सभापती, शिक्षण मंडळ सदस्या,येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवास्थानाच्या संस्थापक अध्यक्षा तसेच मावळ तालुका माहिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा म्हणून त्यांनी पदभार भूषविले आहेत.
यावेळीस, ही निवड केवळ माझा सन्मान नसून महाराष्ट्र, गोवा आणि देशातील संपूर्ण महिला वकील वर्गाचा सन्मान आहे. महिला वकिलांच्या अडचणी, नवोदित वकिलांचे प्रश्न आणि विधी व्यवसायाची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी काम करणार असल्याचे मत अँँड. रंजना भोसले यांनी व्यक्त केले.





