Talegaon Dabhade : शिक्षण आणि संस्कृतीचा सुरेल संगम ; इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या संगीत सोहळ्याला नागरिकांचा उदंड प्रतिसाद

प्रभात वृत्तसेवा
तळेगाव दाभाडे – इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने दिवाळी सुरसंध्या संगीत सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमाने तळेगाव दाभाडे शहरासह मावळ पंचक्रोशीतील नागरिक, विद्यार्थी, पालक आणि आज-माजी विद्यार्थी यांना सांस्कृतिक मैत्रीच्या माध्यमातून एकत्र आणले.याप्रसंगी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाही चंद्रकांत शेटे, उपाध्यक्ष शैलेश शहा, उपाध्यक्ष संजय साने, खजिनदार निरुपा कानेटकर, इतर संस्था पदाधिकारी तसेच इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य संभाजी मलगे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य संजय आरोटे, इंजीनियरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर साहेबराव पाटील,
विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक व तळेगावतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या यशोदा महादेव काकडे अभियांत्रिकी महाविद्यालय, इंद्रायणी महाविद्यालय, कृष्णाराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च या विभागांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. संगीत क्षेत्रातील नामवंत गायक संदीप पंचवाटकर यांच्या नियोजनातून रंगलेल्या या दिवाळी सुरसंध्या कार्यक्रमात सुर नवा ध्यास नवा फेम कौस्तुभ दिवेकर, राजेश्री पवार, संदीप उबाळे, आणि कृती पेटकर या कलाकारांनी हिंदी आणि मराठी गाण्यांचा सुरेल मेळ सादर करत रसिकांची मने जिंकली.
विशेषतः कौस्तुभ दिवेकर यांनी स्त्री आवाजात सादर केलेल्या गीतांना उपस्थितांकडून प्रचंड दाद मिळाली.कार्यक्रमादरम्यान आकाशात रंगीत फुगे सोडून दीपावली सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी उपस्थित सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष शैलेश शहा यांनी केले. कार्यक्रमाचे आभार इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी केले.




