‘पंचधातू सांगून तकलादू लोखंड वापरण्यात आले’, ठाकरे गटाच्या आमदाराचा खळबळजनक आरोप

Shivaji Maharaj Statue Collapsed । सिंधुदुर्ग मालवण येथील राजकोट किल्यावर किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्यापुतळा सोमवारी दुपारी कोसला. उभा दुर्देवी घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट कोसळली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिंदे सरकारवर निशाणा साधला जात आहे.
या घटनेनंतर आता पोलिसांनी पहिली कारवाई करत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. कंत्राटदार जयदीप आपटे आणि डॉ. चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविकास आघाडी पक्षाकडून यावर दुर्देवी घटनेवरून शिंदे सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे.
अशात आता ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोपही केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्यावर उभारावा अशी मागणी इतिहास प्रेमींनी केली होती. पण श्रेय घ्यायला हा पुतळा राजकोटमध्ये उभारण्यात आला. त्यावेळी पुतळा कमजोर असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले होते. इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत, छत्रपती संभाजी राजे यांचाही विरोध होता. मात्र विरोध डावलून पुतळ्याची उभारणी करण्यात आली.
ते पुढे म्हणाले, सोमवारी दुपारी घडलेली घटनेनंतर शिवप्रेमींचा उद्रेक दिसला. मालवणमध्ये महाराष्ट्रातून शिवप्रेमी येऊन निषेध मोर्चा काढणार आहे. हा पुतळा बांधकाम करतेवेळी पंचधातूचा असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र यासाठी तकलादू लोखंड वापरले गेले. याची विटंबना केली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्यासाठी काही लोक काम करत आहेत त्याची पण चौकशी व्हायला हवी अशी मागणी नाईक यांनी केली.





