Nitin Deshmukh : ‘पैसे कुणाकडूनही घ्या, पण मतदान आमच्या उमेदवाराला करा’; आमदार नितीन देशमुखांच्या वक्तव्याची चर्चा
Nitin Deshmukh : बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्या एका कथित वक्तव्यामुळे मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.

Nitin Deshmukh : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांच्या कथित वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. ‘मतदानासाठी कुणाकडूनही पैसे घ्या, मात्र मतदान आमच्या उमेदवाराला करा,’ असं वक्तव्य त्यांनी केल आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, याप्रकरणी निवडणूक आयोग काय भूमिका घेतो, याकडे लक्ष लागले आहे. (Nitin Deshmukh)
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार असल्याचे निवडणूक कार्यक्रमात नमूद करण्यात आले आहे. या निवडणुकीत विविध पक्ष आणि उमेदवारांकडून प्रचार सुरू आहे. (Nitin Deshmukh)
निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष
नितीन देशमुख यांच्या कथित वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल झाली आहे का, तसेच आयोगाकडून काही चौकशी किंवा कारवाई सुरू झाली आहे का, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणात आयोगाची भूमिका स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Nitin Deshmukh)





