पुणे | शहरातील पूरस्थितीवर उपाययोजना करा
Updated On:

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात मान्सूनपूर्व पावसाने मोठे नुकसान होत आहे. यामुळे पावसाळी कामांचा पुन्हा आढावा घेऊन पूरस्थितीवर तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी काॅग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी महापालिका आयुक्त राजेंद्र कुमार यांच्याकडे केली आहे.
मंगळवारी पावसाने शहरभर पाणी साचले. तसेच नाल्यांची आणि चेंबरची सफाई न झाल्याने पावसाचे पाणी साठून अनेक घरांमध्ये शिरले. त्यामुळे पुणेकरांची अनेक ठिकाणी धांदल उडाली. त्यामुळे प्रशासनने शहराच्या गावठाण मध्यवस्तीतील पावसाळी गटारे,
लाइन्स साफ झाल्याचा प्रत्यक्ष आढावा घ्यावा. वापराविना रस्त्याकडेला उभी असणारी वाहने, रस्त्यावरील अडथळे, अतिक्रमणे तातडीने हटवावीत, अशी मागणी तिवारी यांनी केली आहे.





