पिंपरी | तायडे यांनी पिंपरी विधानसभेसाठी भरला पक्ष उमेदवारी अर्ज
Updated On:

पिंपरी, (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून येणार्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी ’पक्ष उमेदवारी अर्ज’ मागवण्यात आले आहेत.
हे अर्ज पिंपरी मध्यवर्ती कार्यालय येथे उपलब्ध होते.अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर होती.
पिंपरी विधानसभेसाठी इच्छुक असलेले देवेंद्र तायडे यांनी ’पक्ष उमेदवारी अर्ज’ पक्षाच्या पिंपरी मध्यवर्ती कार्यालय येथे जमा केला.
शहर सरचिटणीस जयंत शिंदे यांनी हा अर्ज स्वीकारला. यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, सचिव कमलेश वाळके व कार्यालयीन सहाय्यक अविनाश कांबळे उपस्िथत होते.





