भारताला मोठे यश ! मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा ; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिली परवानगी

Tahawwur Rana’s extradition । २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वुर राणा याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी मंजुरी दिली आहे. पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक तहव्वुर राणा याच्या प्रत्यार्पणाची मागणी भारत बऱ्याच काळापासून करत होता. तहव्वुर राणा २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी हवा आहे. कनिष्ठ न्यायालयांमध्ये कायदेशीर लढाई हरल्यानंतर, तहव्वुर राणा यांनी भारतात प्रत्यार्पणाविरुद्ध अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.त्यानुसार आता या प्रकरणात भारताला मोठे यश मिळाले आहे.
तहव्वुर राणाची ही शेवटची संधी Tahawwur Rana’s extradition ।
कनिष्ठ न्यायालये आणि अनेक संघीय न्यायालयांमध्ये कायदेशीर लढाई हरल्यानंतर, तहव्वुर राणा यांनी शेवटचा सॅन फ्रान्सिस्कोमधील यूएस कोर्ट ऑफ अपील्स फॉर द नॉर्दर्न सर्किटमध्ये अर्ज केला. भारतात प्रत्यार्पण न होण्याची राणाची ही शेवटची कायदेशीर संधी होती. 16 डिसेंबर रोजी, यूएस सॉलिसिटर जनरल एलिझाबेथ बी प्रीलॉगर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका फेटाळण्याची विनंती केली. राणाचे वकील जोशुआ एल ड्रेटेल यांनी 23 डिसेंबर रोजी त्याच्या उत्तरात अमेरिकन सरकारच्या शिफारशीला आव्हान दिले आणि सर्वोच्च न्यायालयात त्याची रिट स्वीकारण्याची विनंती केली होती.
राणावर आहेत ‘हे’ गंभीर आरोप
तहव्वु राणावर डेव्हिड हेडलीला मदत केल्याचे गंभीर आरोप आहेत. त्याने या हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडलीला मुंबईतील महत्वाच्या ठिकाणांवर रेकींगमध्ये मदत केली होती. भारताने २६/११ हल्ल्यातील लक्ष्यांच्या रेकींगचे भक्कम पुरावे अमेरिकन न्यायालयात सादर केले होते. २००९ मध्ये त्याला शिकागो येथून अटक करण्यात आली होती. त्याच्यावर आयएसआय आणि लष्कर-ए-तैयबाशी संबंध असल्याचाही आरोप आहे. याशिवाय, त्याला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा कार्यकर्ता म्हणून वर्णन केले आहे.
२००८ मध्ये झाला मुंबईवर दहशतवादी हल्ला
२६ नोव्हेंबर २००८ रोजी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहा अमेरिकन नागरिकांसह एकूण १६६ लोक मारले गेले. या हल्ल्यात १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी ६० तासांहून अधिक काळ मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केले.
हेही वाचा
‘ट्रम्प असते तर हे संकट आले नसते’ ; युक्रेन युद्धावर रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची कबुली





