‘मी पाकिस्तानी वंशाचा मुस्लिम, भारतात मला छळतील…’ ; प्रत्यार्पण टाळण्यासाठी तहव्वुर राणाची नवी युक्ती

Tahawwur Rana extradition । मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा यांनी भारतात प्रत्यार्पण टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. राणाने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्याच्या प्रत्यार्पणाला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली आहे.त्यासाठी नवीन शक्कल लढवली असल्याची माहिती समोर आली आहे.
“पाकिस्तनी मुस्लिम असल्याने माझा भारतात छळ होणार” Tahawwur Rana extradition ।
तहव्वुर राणा यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची एक विशेष प्रत उपलब्ध आहे. याचिकेत तहव्वुर राणा याने,” जर मला भारतात प्रत्यार्पण केले गेले तर माझा छळ केला जाईल. मी भारतात जास्त काळ जगू शकणार नाही.” असा दावा त्याने आपल्या याचिकेत केला आहे. पुढे त्याने आपल्या याचिकेत, मी पाकिस्तानी वंशाचा मुस्लिम असल्याने त्याला भारतात खूप त्रास दिला जाईल.” असेही त्याने म्हटले. यासाठी त्याने ह्यूमन राईट्स वॉच २०२३ च्या जागतिक अहवालाचा दाखल दिला आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की भारतातील भाजप सरकार धार्मिक अल्पसंख्याकांशी, विशेषतः मुस्लिमांशी भेदभाव करते.”
पुढे याचिकेत असेही म्हटले आहे की, भारत सरकार अधिकाधिक हुकूमशाही होत चालले आहे आणि भारत सरकारच्या स्वाधीन केल्यास त्याचा छळ केला जाईल असे मानण्याची पुरेशी कारणे आहेत. ” असे म्हटले आहे. तसेच पुढे तहव्वुर राणा याने याचिकेत, त्यांना अनेक आजार आहेत. त्याला पार्किन्सनचाही त्रास आहे. त्यांना अशा ठिकाणी पाठवू नये जिथे त्यांना राष्ट्रीय, धार्मिक आणि सांस्कृतिक आधारावरून लक्ष्य केले जाईल” अशी विनंती देखील त्याने केली असल्याची माहिती समोर येत आहे.
तेहव्वुर राणा कोण आहे? Tahawwur Rana extradition ।
तहव्वुर राणा यांचा जन्म पाकिस्तानात झाला. त्यांनी आर्मी मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आणि १० वर्षे पाकिस्तान आर्मीमध्ये डॉक्टर म्हणून काम केले. पण तहव्वूर राणा यांना त्यांचे काम आवडले नाही आणि त्यांनी ही नोकरी सोडली. भारताविरुद्ध दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेला तहव्वुर राणा सध्या कॅनडाचा नागरिक आहे. पण अलिकडेच तो शिकागोचा रहिवासी होता, जिथे त्याचा व्यवसाय आहे.
न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, त्याने कॅनडा, पाकिस्तान, जर्मनी आणि इंग्लंडमध्ये प्रवास केला आहे आणि वास्तव्य केले आहे आणि त्याला सुमारे ७ भाषा बोलता येतात. न्यायालयीन कागदपत्रांवरून असे दिसून येते की २००६ ते नोव्हेंबर २००८ पर्यंत तहव्वुर राणाने डेव्हिड हेडली आणि पाकिस्तानमधील इतरांसोबत कट रचला. या काळात तहव्वुर राणाने लष्कर-ए-तैयबा आणि हरकत उल जिहाद ए इस्लामी या दहशतवादी संघटनांना मदत केली आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याची योजना आखली आणि ती राबवण्यास मदत केली. या प्रकरणात दहशतवादी हेडली सरकारी साक्षीदार बनला आहे.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी काय घडले?
२६ नोव्हेंबर २००८ रोजी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. हा दहशतवादी हल्ला उधळून लावण्यासाठी २०० एनएसजी कमांडो आणि ५० आर्मी कमांडो मुंबईत पाठवण्यात आले. याशिवाय, तिथे पाच लष्करी तुकड्याही तैनात करण्यात आल्या होत्या. हल्ल्यादरम्यान नौदलालाही सतर्क ठेवण्यात आले होते.
मुंबई दहशतवादी हल्ला उधळून लावण्याच्या कारवाईत मुंबई पोलिस, एटीएस आणि एनएसजीचे ११ जवान शहीद झाले. त्यामध्ये एटीएस प्रमुख हेमंत करकरे, एसीपी अशोक कामटे, एसीपी सदानंद दाते, एनएसजी कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन, एन्काउंटर स्पेशालिस्ट एसआय विजय साळसकर, इन्स्पेक्टर सुशांत शिंदे, एसआय प्रकाश मोरे, एसआय दुडगुडे, एएसआय नानासाहेब भोसले, एएसआय तुकाराम ओंबळे, कॉन्स्टेबल विजय खांडेकर, जयवंत पाटील, योगेश पाटील, अंबादास पवार आणि एम.सी. यांचा समावेश आहे. चौधरी यांचा समावेश होता.





