“हातात बेड्या, कमरेला साखळ्या…” ; तहव्वुर राणा ‘अशा’ प्रकारे NIA च्या ताब्यात, पहा फोटो व्हायरल

Tahawwur Rana Extradition । २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाला भारतात आणले गेले आहे. एनआयए न्यायालयाने त्याला १८ दिवसांची कोठडी सुनावली आहे. या काळात, एनआयए मुंबई हल्ल्याशी संबंधित सर्व पैलूंची चौकशी करणार आहे. दरम्यान, कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टमधील अमेरिकन मार्शलनी तहव्वुर राणाचा ताबा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रतिनिधींना सोपवला तेव्हाचा एक फोटो समोर आला आहे.
तहव्वुरला एनआयए मुख्यालयाच्या तळमजल्यावरील एका कक्षात ठेवण्यात आले आहे. या खोलीच्या वर, तिसऱ्या मजल्यावर असलेल्या चौकशी कक्षात राणाची चौकशी होणार आहे. तपास पथकाचे नेतृत्व डीआयजी जया रॉय करतील. राणाला अमेरिकेतून भारतात आणण्यात रॉय यांनी मोठी भूमिका बजावली आहे. या चौकशीचा दैनिक अहवाल सदस्यांना पाठवला जाईल.
भारताचे मोठे यश Tahawwur Rana Extradition ।
भारत गेल्या अनेक वर्षांपासून राणाच्या प्रत्यार्पणाची मागणी करत होता. हे थांबवण्यासाठी राणाने अमेरिकेतील प्रत्येक न्यायालयाचे दरवाजे ठोठावले, परंतु सर्वोच्च न्यायालयाकडूनही त्यांना दिलासा मिळाला नाही. ९ एप्रिल रोजी, यूएस मार्शलने त्याला लॉस एंजेलिस विमानतळावर भारताच्या स्वाधीन केले.
US Marshals in the Central District of California on Tuesday transferred custody of Tahawwur Rana, a Pakistani national and Canadian citizen, to representatives from India’s Ministry of External Affairs.
Tahawwur Rana is now in NIA custody for 18 days, during which time the… pic.twitter.com/vWBcl9vGWQ
— ANI (@ANI) April 11, 2025
तेहव्वुर राणाचा सेल कसा आहे? Tahawwur Rana Extradition ।
सेलमध्ये झोपण्यासाठी जमिनीवर एक बेड ठेवण्यात आला आहे.आत बाथरूमची सुविधा आहे. हा सेल १४ बाय १४ चा आहे. राणा यांना सेलमध्येच अन्न आणि इतर आवश्यक वस्तू पुरवल्या जातील. या कक्षात बहुस्तरीय डिजिटल सुरक्षा आहे, जिथे रक्षक २४ तास पहारा देतील. एनआयएच्या फक्त १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच कक्षात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
हेही वाचा
तहव्वुर राणा गजाआड, पण मिशन सुरू ; वाचा २६/११ च्या मास्टरमाइंड्सना शोधणारी भारताची ‘ही’ ‘हिटलिस्ट’




