मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाला १८ दिवसांची कोठडी ; NIA मुख्यालयात होणार चौकशी

Tahawwur Rana Extradition । मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याला काल भारतात आणले. त्यानंतर पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने दहशतवादी तहव्वुर राणाला १८ दिवसांची कोठडी ठोठावली आहे. एनआयएने न्यायालयात राणाच्या २० दिवसांच्या रिमांडची मागणी केली होती. चौकशीसाठी तहव्वुरची रिमांड आवश्यक असल्याचे तपास यंत्रणेने म्हटले आहे.
सीआयएसएफ व्यतिरिक्त, इतर निमलष्करी दलांचे जवानही न्यायालयाबाहेर तैनात होते. त्याला एका खास बुलेटप्रूफ वाहनातून न्यायालयात आणण्यात आले. एनआयए आणि रॉ यांच्या संयुक्त पथकाने तहव्वुर राणाला अमेरिकेतून दिल्लीला आणले. एनआयएच्या पथकाने गुरुवारी तहव्वुर हुसेन राणाला औपचारिकरित्या अटक केली.
सर्व दहशतवादी नेटवर्क उघड होणार Tahawwur Rana Extradition ।
एनआयएला तहव्वुर राणाकडून भारतातील दहशतवादी नेटवर्क आणि २६/११ हल्ल्याच्या कटाशी संबंधित सर्व पैलूंबद्दल माहिती मिळवायची आहे. २००८ च्या मुंबई हल्ल्यातील मुख्य सूत्रधाराला न्यायालयीन प्रक्रियेच्या कक्षेत आणण्यासाठी वर्षानुवर्षे केलेल्या प्रयत्नांनंतर हे प्रत्यार्पण झाल्याचे एनआयएने एक निवेदन जारी केले. तपास यंत्रणेने, यूएसडीओजे, यूएस स्काय मार्शल यांच्या सक्रिय मदतीने, एनआयएने संपूर्ण प्रत्यार्पण प्रक्रियेदरम्यान इतर भारतीय गुप्तचर संस्था, एनएसजी सोबत जवळून काम केले असे म्हटले.
ट्रम्प यांनी केली होती प्रत्यार्पणाची घोषणा Tahawwur Rana Extradition ।
फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेची राजधानी भेट दिली तेव्हा तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाची घोषणा अखेर करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १४ फेब्रुवारी २०२५ रोजी पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या संयुक्त परिषदेत म्हटले होते की, “आम्ही एका अत्यंत हिंसक व्यक्तीला ताबडतोब भारतात परत पाठवत आहोत जेणेकरून त्याला भारतात न्याय मिळवून देता येईल. राणाला अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील मेट्रोपॉलिटन डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. भारत-अमेरिका प्रत्यार्पण करारांतर्गत सुरू झालेल्या कार्यवाहीनंतर त्याला अमेरिकेत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते.
तहाव्वुरने प्रत्यार्पण रोखण्यासाठी प्रयत्न केला
तहव्वुर राणाने त्याचे प्रत्यार्पण रोखण्यासाठी अनेक कायदेशीर पर्यायांचा प्रयत्न केला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्ट कोर्टाने १६ मे २०२३ रोजी तहव्वुर राणा यांच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी नवव्या सर्किट कोर्ट ऑफ अपीलमध्ये अनेक दावे दाखल केले, जे सर्व फेटाळण्यात आले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन रिट, दोन हेबियस कॉर्पस याचिका आणि एक आपत्कालीन याचिका दाखल केली, परंतु त्या देखील नाकारण्यात आल्या.
हेही वाचा
हेलिकॉप्टर दुर्घटना ! अमेरिकेत हडसन नदीत कोसळले हेलिकॉप्टर ; ३ चिमुरड्यांसह ६ जणांचा मृत्यू





