ताडोबा प्रकल्प पर्यटकांसाठी सुरक्षित
Updated On:

ताडोबा – राज्यात अनेक ठिकाणी बर्ड फ्लूची लागण झाली असली तरी, पक्षांचा मोठा अधिवास असलेल्या ताडोबा प्रकल्पात अजून तरी याची लागण झालेली नाही. त्यामुळे ताडोबा पर्यटकांसाठी अद्याप सुरक्षीत आहे, अशी माहिती ताडोबा प्रशासनानं दिली आहे.
ताडोबात ३२० प्रकारचे पक्षी आढळतात. बर्ड फ्लू राज्यात आल्यापासून या सर्व पक्ष्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ताडोबा कोअर आणि बफर क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले असून, रोज त्याची माहिती वरिष्ठांना दिली जात आहेत.
स्थानिक पक्ष्यांसोबतच स्थलांतरित पक्षीही या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येतात. ताडोबाच्या बफर क्षेत्राला लागून असलेल्या इरई धरणाच्या कुरण क्षेत्रात त्यांचा मोठा वावर असतो. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता ताडोबाचे सर्व कर्मचारी निरीक्षणासाठी सज्ज असल्याचं देखील प्रशासनानं म्हटलं आहे.





