Hera Pheri Movie : ‘हेरा फेरी’च्या तिसऱ्या भागात तब्बू दिसणार? अभिनेत्रीची पोस्ट पाहून चाहते झाले चकित, म्हणाली “माझ्या शिवाय स्टारकास्ट….

गेल्या काही वर्षांत हेरा फिर ३ लवकरच रिलीज होणार असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. काही माध्यमांनी तर सिनेमाच्या शुटिंगला देखील सुरूवात झाल्याचे म्हटले होते. मात्र, आता या फ्रिचाइंचे प्रमुख खुद्ध हेरा फेरीच्या दिग्दर्शकानेच तिसऱ्या भागाची अनाउसमेंन्ट केली आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हेरा फेरी ३ सिनेमाची अधिकृत घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
प्रियदर्शन यांनी ३० जानेवारीला वाढदिवसाच्या दिवशी शेअर केलेल्या पोस्टववर अक्षय कुमाराने प्रियदर्शनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिणारी पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये सेटवर संपूर्ण दिवस तुझ्यासोबत घालवण्यापेक्षा तुझा वाढदिवस तुझ्यासोबत साजरा करण्याचा चांगला मार्ग आणखी कोणता असू शकतो, असे अक्षयने म्हटले आहे.
यावर दिग्दर्शक प्रियदर्शनने मी रिटर्न गिफ्ट्स देखील देतो आणि मला ‘हेरा फेरी ३’ बनवायचा आहे. तुम्ही तयार आहात का? असा प्रश्न अक्षयच्या पोस्टला रिप्लाय देताना विचारला आहे. तसेच ही पोस्ट सुनील शिट्टी आणि परेश रावेल यांना टॅग केली आहे. त्यांनीही या पोस्टला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता हेरा फिरच्या तिसऱ्या भागावरचा पडदा उठला असून सिनेमा लवकरच अॅान फ्लोअर येइल अशी चर्चा केली जात आहे.
या पोस्टनंतर या फ्रिचाइच्या पहिल्या भागात असणारी अभिनेत्री तब्बूने सोमावारी तिच्या इंन्स्टाग्राम स्टोरीवर अक्षय कुमाराची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत तब्बूने माझ्याशिवाय स्टारकास्ट पूर्ण होणार नाही असे म्हटले आहे. त्यामुळे हेरा फेरीच्या तिसऱ्या भागात तब्बु देखील असणार का याची चर्चा केली जात आहे. तिची ही पोस्ट पाहून चाहते देखील चक्कीत झाले आहेत. तब्बू प्रियदर्शनने दिग्दर्शित केलेल्या ‘हेरा फेरी’ (२०००) या सिनेमात दिसली होती.




