Tabu : मोकळे केस, मनमोहक अदा..; काळ्या ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये ‘तब्बू’चं बोल्ड फोटोशूट !

Updated On:
Photo 1

Tabu – चांदनी बार, माचिस, हतूतू, अस्तित्व, हैदर याच नाही तर सध्याच्या फितूर, अंदाधून यांसारख्या चित्रपटातून साकारलेल्या भूमिकेसाठी अभिनेत्री तब्बूचं प्रचंड कौतुक झालं. या सगळ्या चित्रपटातील हटके भूमिका तिच्या पदरात पडल्या आणि उत्तमरित्या पेलल्यासुद्धा आहे.

चाहत्यांच्या लाडक्या अभिनेत्रीने इंडस्ट्रीत कमबॅक केल्यापासून ‘अंधाधुन’, ‘भूल भुलैया 2’, ‘द क्रू’, ‘दृश्यम 2’ यासह अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये तब्बूने काम केले आहे. वयाच्या 53 व्या वर्षी तिच्या परफेक्ट फिगरने तिच्या चाहत्यांनाही वेड लावले आहे. नुकतेच अभिनेत्रीने तिचे काही सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.

तब्बूने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री तिच्या किलर लुकसह आणि भेदक डोळ्यांनी कहर करताना दिसत आहे. तिच्या सौंदर्याचे चाहते वेडे झाले आहेत. या लेटेस्ट फोटोशूटमध्ये तब्बू ब्लॅक कलरची नाईटी परिधान करताना दिसत आहे. कधी सोफ्यावर बसून तर कधी जमिनीवर बसून मनमोहक पोझ देत आहे.

यामध्ये तब्बूने खुले केस, न्यूड मेकअप आणि सोनेरी कानातले घालून तिचा लूक पूर्ण केला आहे. अभिनेत्रीने हे फोटोशूट तिच्या घरातील लिव्हिंग रूममध्ये केले आहे. फोटोंमधील अभिनेत्रीची परफेक्ट फिगर आणि सुंदर लूक चाहत्यांची मने जिंकत आहेत.

तब्बूच्या या फोटोंवर चाहते वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एकाने अभिनेत्रीला ‘गॉर्जियस’ म्हटले, तर दुसरा म्हणाला, ‘तू स्वतःला खूप छान सांभाळले आहेस. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तब्बू शेवटची करीना कपूर आणि क्रिती सेननसोबत ‘क्रू’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...;  तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?