Taarak Mehta : म्हणून मालिकेतील ‘त्या’ प्रसिद्ध डायलॉगवर बंदी घातली; स्वतः दिलीप जोशींनी सांगितला किस्सा…

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका “तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या 16 वर्षांपासून लोकांना हसवत आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण हा शो मोठ्या आवडीने पाहतात.
गोकुलधाम सोसायटी 16 वर्षांपूर्वी सुरू झाली, ज्यामध्ये जेठालाल, दयाबेन, टप्पू सेना, भिडे, माधवी भाभी, बबिता जी ते अय्यर आणि सोढी सारखी पात्रे दिसली.
प्रत्येक पात्राने आपल्या अभिनयाने लोकांना खूप हसवले. या मालिकेत मुख्य भूमिकेत असणाऱ्या दयाबेन अर्थात दिशा वकानीने 2017 मध्ये प्रसूती रजा घेतली होती. तेव्हापासून ती शोमध्ये परतली नाही.
अनेकांनी तिला मालिकेत पुन्हा परतण्याची मागणी केली. परंतु अद्याप तिचे मालिकेत पुनरागमन झाले नाही. मालिकेत दयाबेन आणि जेठालाल यांची जोडी सर्वाधिक लोकप्रिय आहे.
त्यांचे अनेक मिम्स, व्हिडिओ आणि डायलॉग सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का? याच मालिकेतील एका प्रसिद्ध डायलॉगवर बंदी घालण्यात आली आहे.
हा डायलॉग प्रेक्षकांना खूप आवडला पण काही महिला संघटनानी यावर आक्षेप घेतला. त्यामुळे मालिकेच्या निर्मात्यांनी हा डायलॉग स्क्रिप्टमधून वगळण्याचा निर्णय घेतला अशी माहिती आहे.
याबद्दल बोलताना अभिनेते दिलीप जोशी म्हणतात की, मालिकेत ‘ये पागल औरत…’ हा डायलॉग कधीच स्क्रिप्टमध्ये नव्हता. तो स्वत: मी स्क्रिप्टमध्ये घेतला होता. हा डायलॉग जेव्हा जेठालालची बायकोसोबत भांडण किंवा इतर वेळी म्हणत होते. असं ते सांगतात.
दिलीप जोशी यांनी नुकतीच एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी या मालिकेतील प्रसिद्ध डायलॉग संदर्भात खुलासा केला आहे.
दरम्यान, ही मालिका सोडल्यानंतर अनेक कलाकारांनी तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेवर लैंगिक छळाचा आरोप केला तर कोणी सेटवर अपमानास्पद वागणुक मिळाल्याचा आरोप केला.





