‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेत्री घेणार घटस्फोट; पतीपासून विभक्त होण्याचा घेतला निर्णय

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका मागील काही वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरतपणे मनोरंजन करत आहे. मात्र या मालिकेतील ‘बावरी’ ही व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री नविना बोले हिचा घटस्फोट होणार आहे. नविना सात वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकली होती. ‘इश्कबाज’ या मालिकेतील ‘टिया’ या व्यक्तिरेखेने नवीना बोले ही चांगलीच लोकप्रिय झाली.
गेल्या काही दिवसांपासून नविनाच्या वैवाहिक आयुष्यामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यांच्या लग्नाला 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु काही कारणांमुळे नविना आणि तिच्या नवऱ्यामध्ये दुरावा वाढल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यानंतर नविना तिचा पती अभिनेता-निर्माता जीत करणपासून वेगळी झाली आहे. नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान नवीनाने खुलासा केला आहे. Taarak Mehta Ka Ooltah Chashmah |
View this post on Instagram
एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, ‘तीन महिन्यांपूर्वी पती जीतपासून मी विभक्त झाले. आता आम्ही लवकरच कायदेशीर प्रक्रिया सुरू करू आणि अधिकृत घटस्फोट घेऊ. विभक्त झाल्यानंतरही, जीत आणि मी आमच्या 5 वर्षांच्या मुलीला एकत्र वाढवू आणि जीत आठवड्यातून दोन दिवस आपल्या मुलीसोबत घालवेल. आम्ही परस्पर संमतीने घटस्फोट घेत आहोत. सुरुवातीला आमच्या लग्नात सर्वकाही चांगले चालले होते, परंतु नंतर सर्वकाही बदलले. आम्ही आमच्या मुलीसाठी आमचे लग्न वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु काहीही झाले नाही. त्यानंतर आम्ही एकमेकांशी शांतपणे बोललो आणि वेगळे होण्याचा निर्णय घेतला.” Taarak Mehta Ka Ooltah Chashmah |
अभिनेत्रीने घटस्फोट घेण्यामागचे नेमकं कारण स्पष्टपणे सांगितले नाही. ही एक कौटुंबिक बाब असून या प्रकरणावर थोडी गोपनीयता हवी असल्याचे देखील तिने सांगितले. दरम्यान, नवीना बोलेने वर्ष 2017 मध्ये अभिनेता-निर्माता जीत करणसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर 2019 मध्ये नवीना आई झाली. परंतु आता त्यांच्या विभक्त होण्याच्या बातमीने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
हेही वाचा:





