तापसी पन्नूचा सेल्फी देण्यास नकार; चाहतीने व्यक्त केला संताप

Taapsee Pannu | बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. त्यानंतर आता तिचा एका कार्यक्रमातील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात एक चाहती तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी येते. मात्र तापसी पन्नू तिला सेल्फीसाठी नकार देताना दिसते. हा व्हिडिओ व्हायरल होताच त्या मुलीने तापसीवर संताप व्यक्त करत तेथे काय घडलं याची माहिती सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे.
व्हायरल व्हिडिओत एक मुलगी तापसीसोबत स्टेजवर दिसते. ती तापसीसोबत हात मिळवणी देखील करते, मात्र जेव्हा ती तापसीकडे सेल्फीची मागणी करते तेव्हा तापसी तिला नम्रपणे नकार देते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्या मुलीने तापसीच्या वागण्यावर संताप व्यक्त केला आहे. ती एक इन्फ्लुएन्सर आहे.
यानंतर व्हिडिओवर प्रतिक्रिया देत त्या मुलीने लिहिलं, ‘ती मी आहे. मला समजत नाही की जेव्हा तुम्ही चारी बाजूने कॅमेरांनी वेढलेले असता तेव्हा तुम्ही सेल्फीसाठी का नकार देता? आमच्यासारख्या इन्फ्लुएन्सरना बोलावण्याचं मुख्य कारण हे तिच्या चित्रपटाचं गाणं प्रमोट करणं होतं. तिला एका चांगल्या पीआरची गरज आहे. ‘ त्यावर एका युझरने तिला तापसी तिच्यासोबत काय बोलली हे विचारल्यावर तिने लिहिलं, ‘तापसी म्हणाली की स्टेजवर सेल्फी घेऊ येथे सगळेच आहेत.’ तर काहींनी तुम्ही तिच्याकडे सेल्फीसाठी गेलातच का असा प्रश्नही विचारला आहे.
दरम्यान,अक्षय कुमार, तापसी पन्नू ‘खेल खेल में’ चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात वाणी कपूर, ॲमी विर्क, आदित्य सील आणि प्रज्ञा जैस्वाल यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट यावर्षी १५ ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:
“ऑलिम्पिकमुळे खेळाडूंना जागतिक पटलावर तिरंगा फडकवण्याची संधी” ; ‘मन कि बात’मधून पंतप्रधानांचे भाष्य





