#T20WorldCup | दक्षिण आफ्रिकेचा सहज विजय
Updated On:

अबुधाबी – तबरेज शम्सी व लुंगी एन्जीडी यांच्या गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा 41 धावांनी पराभव केला व टी-20 विश्वकरंडक स्पर्धेपूर्वीच्या सराव सामन्यात विजयाची नोंद केली.
दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 बाद 145 धावा केल्या. त्यात एडन मार्करमने 48 तर, थेम्बा बवुमाने 31 धावांची खेळी केली. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रेहमानने 3 गडी बाद केले.
विजयासाठी आवश्यक धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा डाव 20 षटकांत 8 बाद 104 धावांवर रोखला गेला. कर्णधार महंमद नबीने सर्वाधिक 34 धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून तबरेज शम्सीने 3 तर, लुंगी एन्जीडीने 2 गडी बाद केले.





