#T20WorldCup | गेलने दिले निवृत्तीचे संकेत

दुबई– युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानंतर बॅट हातात उंचावून खेळाडूंना अलिंगन देत मैदान सोडले. त्याच्या या कृतीमुळे आता गेल लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या विश्वकरंडक टी-20 स्पर्धेतील सामन्यात गेलने निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे लवकरच जाहीर होणार आहे. गेलने ऑस्ट्रेलियावरुद्धच्या सामन्यात 15 धावा केल्या. या पूर्ण खेळीमध्ये गेलने दोन षटकार लगावले. बाद होऊन पव्हेलियनमध्ये परतताना त्याने आपली बॅट आणि हेल्मेट हवेत वर केले.
गेलने त्याच्या चाहत्यांकडे पाहून अभिवादनही केले. तो बाद होऊन परतत असताना त्याचे हावभाव पाहून तो वेस्ट इंडिजकडून अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे, असेच त्याच्या चाहत्यांना वाटले.
गेल मैदानातून परतत असताना वेस्ट इंडिजच्या इतर खेळाडूंनी त्याला अभिवादन केले. गेलने इतर खेळाडूंना देलेल्या अलिंगनाचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.





