#T20WorldCup | ५ चेंडूतच संपवली ओव्हर, अंपायरचा निष्काळजीपणा आला समोर

टी-२० विश्वचषक २०२२मध्ये ( T20 WorldCup ) आता क्रिकेटचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. यंदाच्या स्पर्धेत अनेक मोठे संघ अपसेटचे बळीही ठरले आहेत. तर काही संघांनी दमदार खेळ करत सामने जिंकले आहेत. यंदाच्या स्पर्धेत छोट्या संघांविरुद्धचे सामनेही अतिशय रोमांचक झाले आहेत. त्याचबरोबर या वर्षीचा हंगाम अनेक वादातही सापडला आहे. सिडनीमध्ये भारतीय संघाला थंड जेवण मिळणे असो किंवा विराट कोहलीच्या खोलीत प्रवेश करणाऱ्या हॉटेल कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ बनवणे असो. ही स्पर्धा अशाच अनेक वादात सापडली आहे.
#T20WorldCup2022 । अफगाणिस्तान सामना हरल्यानंतर मोहम्मद नबीने लगेचच सोडले कर्णधार पद
त्याचबरोबर मैदानावर महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पंचांच्या निर्णयावरून अनेकदा वादाला तोंड फुटले आहे. सर्वच प्रकरणांमध्ये पंचांची चूक आहे असेही नाही, मात्र अनेक प्रकरणांमध्ये पंचांच्या चुकीमुळे संघाना नुकसान पचवावे लागले आहे. असाच काहीसा प्रकार ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात घडला आहे.
In the 4th over of Australia’s batting Only 5 ball to be bowled.. Poor Umpiring in this tournament… #AUSvAFG pic.twitter.com/zdUnAvOvrF
— GUJARAT TITANS (@Gujrat_titans_) November 4, 2022
ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात कांगारू संघ प्रथम फलंदाजी करत होता. ऑस्ट्रेलियाच्या डावातील चौथ्या षटकात नवीन-उल-हक गोलंदाजी करत होता. त्याने पाच चेंडूत नऊ धावा दिल्या होत्या, पण शेवटचा सहावा चेंडू टाकण्यापूर्वी पंचांनी षटक पूर्ण केले. त्यावेळी मैदानावर याबाबतचा कोणताही गोंधळ झाला नसला तरी आता सोशल मीडियावर अंपायरला प्रचंड ट्रोल केलं जात आले.
Just had a re-watch, this is bizarre.
Ball 3.4 the one in question.
Aussies took 2 then got another on the overthrow.
Was put down as two runs off 3.4 and three runs off 3.5.
Only five deliveries in the over. Very weird. #T20WorldCup https://t.co/3oCdzzwix4
— Lachlan McKirdy (@LMcKirdy7) November 4, 2022
ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकल्याने पंचांच्या त्या निर्णयामुळे कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र याअगोदरही पंचांच्या निर्णयावर अनेक संघांनी सवाल केले आहेत. भारत-पाकिस्तान सामन्यातील शेवटच्या षटकातील पंचांच्या निर्णयावरून पाकिस्तानी खेळाडूंनी नाराजी दर्शवली होती. त्याचबरोबर भारत-बांगलादेश सामन्यात विराट कोहलीच्या कथित फेक फिल्डिंग प्रकारावरूनही पंचांच्या निर्णयाची चर्चा झाली होती.





