T20 WorldCup – झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. झिम्बाब्वेने दिलेल्या १३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ १ धावेने पराभूत झाला. संघाच्या या पराभवानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी टीकांचा वर्षाव केला आहे. यामध्ये पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरचा ( Shoaib Akhtar ) एक जुना व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
“उल्टा पकडा है उल्टा…”, पाकिस्तानी चाहत्याचा अन् देशाच्या झेंड्याचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
पाकिस्तानच्या पराभवानंतर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये शोएब अख्तर ( Shoaib Akhtar ) पाकिस्तानच्या संघातील खेळाडूंवर टीका करत आहे. मात्र महत्वाचं म्हणजे हा व्हिडिओ आत्ताच नसून जुना आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याचे लक्षण दिसत आहे. त्यामुळे सध्याच्या पाकिस्तान संघाच्या परिस्थितीशी जुळत असलेला शोएब अख्तर ( Shoaib Akhtar ) यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
झिम्बाब्वेने रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा एका धावेने पराभव केला. पाकिस्तानला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती, पण शाहीन आफ्रिदीला केवळ एक धाव करता आली आणि पाकिस्तानच्या संघाने सामना गमावला. 2022 च्या टी-20 विश्वचषकातील ( T20 WorldCup ) हा पाचवा उलटफेर आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने पाकिस्तानसमोर 131 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ आठ गडी गमावून केवळ 129 धावाच करू शकला आणि एका धावेने सामना गमावला.
Shoaib Akhtar Today 🤣🤣#PAKvsZIM pic.twitter.com/tJBBGh5XBu
— Amit Kumar (@AMIT_GUJJU) October 27, 2022