T20 World Cup 2026 : सूर्यकुमार यादवचे दमदार अर्धशतक! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या (T20 World Cup 2026) साखळी फेरीतील पहिल्याच सामन्यात भारत आणि अमेरिका (युएसए) यांच्यातील रोमांचक लढत वानखेडे स्टेडियमवर खेळली गेली.

T20 World Cup 2026 : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या (T20 World Cup 2026) साखळी फेरीतील पहिल्याच सामन्यात भारत आणि अमेरिका (युएसए) यांच्यातील रोमांचक लढत वानखेडे स्टेडियमवर खेळली गेली. युएसएने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यांच्या गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजांना सुरुवातीपासूनच दबावात ठेवले.
भारताने २० षटकांत ९ बाद १६१ धावा केल्या. या धावसंख्येत कर्णधार सूर्यकुमार यादव याची नाबाद ८४ धावांची खेळी निर्णायक ठरली. एका बाजूने विकेट्स पडत असतानाही दुसऱ्या बाजूने सूर्यकुमारने एकट्याने लढत भारताची लाज राखली आणि संघाला लढाऊ स्कोअर मिळवून दिला.
सूर्यकुमारचा मोठा विक्रम
टी20 वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदा कर्णधार भूषविणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सूर्यकुमार यादवने दुसरं स्थान पटकावलं आहे. त्याने नाबाद 84 धावांची खेळी केली. या यादीत वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आहे. त्याने 2009 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 88 धावा केल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर बाबर आझम असून त्याने भारताविरूद्ध नाबाद 68 धावा केल्या होत्या.
तसेच, सूर्यकुमार टी-२० विश्वचषकात अर्धशतक करणारा तिसरा भारतीय कर्णधार ठरला. यापूर्वी रोहित शर्माने चार वेळा आणि विराट कोहलीने एकदा हा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे, टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात अर्धशतक करणारा सूर्यकुमार पहिला कर्णधार ठरला.






