T20 World Cup 2024 : विश्वविजेत्या टीम इंडियाच्या भव्य स्वागताची तयारी पूर्ण..! PM मोदींची भेट ते ‘विक्ट्री परेड’, जाणून घ्या संघाचं पूर्ण शेड्यूल….

Victory Parade honouring Team India’s T20 World Cup 2024 win : भारतीय क्रिकेट संघाने बार्बाडोसच्या भूमीवर फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टी-20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले. शनिवारी, 29 जून रोजी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चॅम्पियन बनली. चॅम्पियन बनल्यानंतर वादळामुळे बार्बाडोमध्ये अडकून पडेलला भारतीय क्रिकेट संघ तीन दिवसाच्या प्रतिक्षेनंतर दिल्लीला रवाना झाला आहे. टीम इंडियाला घेऊन जाण्यासाठी बीसीसीआयने विशेष विमान पाठवले आहे.
मायदेशी परतल्यावर खेळाडूंचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. एका रिपोर्टनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी टीम इंडियाला भेटणार आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली आणि युझवेंद्र चहलसह संपूर्ण संघ बार्बाडोसमध्ये चक्रीवादळ बेरीलमुळे अडकला होता. त्यामुळे खेळाडूंना परतण्यास उशीर झाला.
एएनआय (ANI) च्या वृत्तानुसार, बीसीसीआयने खेळाडूंना आणण्यासाठी एअर इंडियाचे बोईंग 777 विमान पाठवले होते. भारतीय खेळाडू एअर इंडियाच्या विशेष विमानाने मायदेशा येण्यासाठी रवाना झाले असून ते बुधवारी 7.45 वाजता भारतात (नवी दिल्ली) परतणार आहेत. भारतीय क्रिकेट संघ मायदेशात परतल्यानंतर प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. टीम इंडिया बुधवारी बार्बाडोसहून दिल्लीला पोहोचत आहे. टीम इंडिया सकाळी गुरूवारी 11 वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचू शकते. पंतप्रधान मोदींची भेट घेऊन ते मुंबईला रवाना होतील.
🏆🇮🇳 Join us for the Victory Parade honouring Team India’s World Cup win! Head to Marine Drive and Wankhede Stadium on July 4th from 5:00 pm onwards to celebrate with us! Save the date! #TeamIndia #Champions @BCCI @IPL pic.twitter.com/pxJoI8mRST
— Jay Shah (@JayShah) July 3, 2024
खुल्या बसमध्ये होणार ‘विक्ट्री परेड’, संपूर्ण वेळापत्रक असे असेल…
टीम इंडिया गुरूवारी सकाळी 11 च्या सुमारास पंतप्रधान मोदींना भेटू शकते. यानंतर नाश्ता केला जाईल. या बैठकीनंतर भारतीय खेळाडू मुंबईला रवाना होतील. यावेळी टीम इंडियाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने समर्थकही विमानतळावर पोहोचू शकतात. त्यानंतर मुंबईत 4 जुलै रोजी संध्याकाळी 5.00 वाजल्यापासून मरीन ड्राइव्ह आणि वानखेडे स्टेडियमकडे खुल्या बसमधून विजयी परेड होईल. टीम इंडियाच्या विश्वचषक विजयाचा गौरव करणाऱ्या विजय परेडसाठी आमच्यात सामील व्हा, अस आवाहन बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी क्रिकेट चाहत्यांना केलं आहे. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह संघांला 125 कोटी रूपायाची बक्षिसाची रक्कम देतील. रोहित शर्मा या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. यानंतर टीम मीडियाशी संवाद साधण्याची शक्यता आहे. या सर्व नंतर सर्व खेळाडू आपापल्या घरी जातील.
2007 च्या ऐतिहासिक क्षणाची मुंबईत होणार पुनरावृत्ती…
टीम इंडियाने 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले होते. यानंतर धोनीसह सर्व खेळाडूंनी ट्रॉफीसह मुंबईत खुल्या बसमधून प्रवास केला. आता पुन्हा तेच होणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव यांच्यासह सर्व खेळाडू यात सहभागी होणार आहेत.





