Wimbledon 2024 Prize Money : अबब..! विम्बल्डन विजेत्याला मिळणार तब्बल ‘इतके’ कोटी रूपये, टी-20 वर्ल्डकप आणि विम्बल्डनच्या बक्षीस रक्कमेत आहे जमीन अस्मानाचा फरक….

Wimbledon 2024 Cash Prize Money : टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी अप्रतिम होती. यादरम्यान भारतीय संघाने शानदार कामगिरी करत ट्रॉफी जिंकली. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना करोडो रुपये मिळाले. भारतीय संघाने 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला. दरम्यान, विम्बल्डनचे आयोजन केले जात आहे. जिथे बक्षिसाच्या रकमेबद्दल जाणून तुम्हालाही धक्का बसेल. टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना इतके पैसे मिळाले नसतील तितके विम्बल्डन विजेत्या एकाच खेळाडूला पैसे दिले जाणार आहेत. दोन्हीही स्पर्धेच्या बक्षीस रक्कमेत जमीन अस्मानचा फरक आहे असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
विम्बल्डनची बक्षीस रक्कम..
वर्षातील तिसरा ग्रँड स्लॅम विम्बल्डनचा 2024 हंगाम 1 ते 14 जुलै दरम्यान लंडन, इंग्लंड येथील ऑल इंग्लंड लॉन टेनिस आणि क्रोकेट क्लब (AELTC) येथे होणार आहे. स्पर्धेला धमाकेदार सुरुवात झाली आहे. जगभरातील क्रीडा प्रेमींची नजर या स्पर्धेवर असणार आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का, ही स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडूला किती रक्कम मिळणार आहे? तसेच उपविजेत्या खेळाडूला किती रक्कम मिळणार आहे? जाणून घेऊया….
विम्बल्डनमधील खेळाडूंच्या बक्षीस रकमेबद्दल सांगायचे तर, चॅम्पियनशिपदरम्यान पुरुष आणि महिला दोघांना समान बक्षीस रक्कम मिळते आणि स्पर्धेतील पहिला सामना गमावलेल्या खेळाडूंना 60,000 पौंड इतकी रक्कम मिळेल. याचा अर्थ फक्त पहिल्या फेरीत बाहेर पडल्यानंतरही, खेळाडूंना अंदाजे 63 लाख भारतीय रुपये मिळतील. विम्बल्डनच्या दुसऱ्या फेरीत बाहेर पडणाऱ्या खेळाडूंना 93,000 पौंड दिले जातील. म्हणजे अंदाजे 98 लाख भारतीय रुपये मिळतील. तिसऱ्या फेरीत बाहेर पडलेल्या खेळाडूंना संपूर्ण स्पर्धेत केलेल्या प्रयत्नांसाठी 143,000 पौंड दिले जातील. म्हणजे 1.5 कोटी भारतीय रुपये होय. चौथ्या फेरीत बाहेर पडलेल्या खेळाडूंना अंदाजे 2.4 कोटी भारतीय रुपये मिळतील.
Wimbledon Open 2024 : भारताच्या हाती निराशा, सुमित नागल पहिल्याच फेरीत पराभूत…
विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झालेल्या खेळाडूंना 375,000 पौंड मिळतील. जे भारतीय रुपयात अंदाजे 4 कोटी रुपये आहे. उपांत्य फेरीतून बाहेर पडणाऱ्या खेळाडूंना 715,000 पौंड म्हणजेच 7.5 कोटी आणि अंतिम सामना हरणाऱ्या खेळाडूंना 1.4 दशलक्ष पौंड मिळतील. जे भारतीय रुपयांमध्ये सुमारे 15 कोटी रुपये आहे. ही रक्कम 2023 च्या उपविजेत्याला मिळालेल्या रक्कमेपेक्षा 19 टक्के जास्त आहे.
विम्बल्डन विजेत्याला मिळतील एवढे रूपये…
विम्बल्डनमध्ये चॅम्पियन होणाऱ्या खेळाडूला तब्बल 2.7 दशलक्ष पौंड इतकी बक्षीस रक्कम मिळेल. जी अंदाजे 28.5 कोटी भारतीय रुपये आहे. ही रक्कम अल्काराझ आणि वोंड्रोसोव्हा यांना शेवटच्या वेळी ट्रॉफी उचलताना देण्यात आलेल्या रकमेपेक्षा सुमारे 15 टक्के जास्त आहे. दरम्यान, विम्बल्डन 2023चा विजेता कार्लोस अल्कारेजला बक्षीस म्हणून 25 कोटी रुपये मिळाले आहेत. त्याचवेळी उपविजेता ठरलेल्या नोव्हाक जोकोविचला 12.25 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे.
टीम इंडियाला टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी मिळालेल्या बक्षीस रकमेशी याची तुलना केल्यास, आयसीसी ने टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी 20 कोटी भारतीय रुपये दिले आहेत. त्याचवेळी बीसीसीआयने संपूर्ण संघासाठी 125 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. ही रक्कम प्रत्येक खेळाडूला वाटल्यास ती विम्बल्डन चॅम्पियन खेळाडूला मिळणाऱ्या रकमेपेक्षा खूपच कमी असेल.





