T20 World Cup 2024 : रोहित-विराटने निवृत्ती घेण्याचे आधीच केले होते निश्चित, अंतिम फेरीतील भावुक करणारा VIDEO व्हायरल…

नवी दिल्ली :– टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यातील एक व्हीडिओ वेगाने व्हायरल होत आहे. भारतीय संघाने २९ जून रोजी झालेल्या टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत विश्वविजेतेपद मिळवले. हा अंतिम सामना भारताचे दोन स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा अखेरचा टी-२० सामना ठरला. या सामन्यानंतर आणि भारताने टी-२० विश्वचषक पटकावल्यानंतर रोहित आणि विराटने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सध्या होत असलेल्या या व्हायरल व्हीडिओवरून दोन्ही खेळाडूंना आपला अखेरचा टी-२० सामना असणार याची आधीच खात्री होती.
अंतिम सामन्यात कोहलीने ७६ धावांची खेळी खेळली ज्यामुळे भारताला सामन्यात समाधानकारक धावसंख्या उभारता आली. दुसरीकडे, रोहित ९ धावा करत बाद झाला. विराट कोहली आणि रोहित शर्माचा व्हायरल व्हिडिओमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली अंतिम सामन्यासाठी प्रथम फलंदाजीसाठी मैदानात जाताना दिसत आहेत.
We failed to notice, but in the finals, before taking the stance, both of them slightly hugged.
Giving a little fist bump is normal, but usually no pair hugs like that. Perhaps cause they knew it was gonna be their last in this format.🥹💗pic.twitter.com/m3nd9v4rxD— Irroh (@irroh45) July 7, 2024
त्यानंतर दोघांनी एकमेकांना हात मिळवत मिठी मारली. शेवटचा टी-२० सामना खेळण्यापूर्वी खेळपट्टीवर पोहोचताच दोन्ही फलंदाज एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. ज्यात म्हटले की या दोन्ही फलंदाजांनी आधीच ठरवले होते की हा त्यांचा शेवटचा टी-२० सामना असेल. तर अनेकांनी म्हटलं की लाइव्ह सामना पाहताना आम्ही हा क्षण पाहण्याचं राहून गेलं.
World Championship of Legends 2024 : गेलची वादळी खेळी, विंडीजचा आफ्रिकेवर सहज विजय…
दुसरीकडे, रोहित शर्माने या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. रोहितने ८ डावात २५७ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याची सरासरी ३६.७१ होती तर स्ट्राइक रेट १५६.७० होता. रोहित शर्मा हा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे, ज्याने एक खेळाडू म्हणून दोन टी-२० विश्वचषक जिंकली आहेत. याआधी त्याने धोनीच्या नेतृत्वाखाली २००७ चे विजेतेपदही पटकावले होते.





