T20 World Cup 2024 (IND vs AFG) : सुपर 8 फेरीत टीम इंडियासमोर अफगाणिस्तानचा लागणार कस, थोड्याच वेळात Toss होणार…

T20 World Cup 2024 (Super 8, IND vs AFG)- सध्या अमेरिका आणि कॅरेबियन बेटांवर चालू असणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वकरंडकात आत्तापर्यंत अजिंक्य राहिलेल्या भारतीय संघासमोर येथील किंगस्टन मैदानावर होणाऱ्या सुपर-८ फेरीच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान संघाचा कस लागणार आहे. या सामन्याचा टाॅस हा 7.30 वाजता होईल तर सामन्यास प्रत्यक्ष सुरूवात 8.00 वाजता होईल.
टीम इंडियाने टी-20 विश्वकरंडकात साखळी फेरीत सलग 3 सामने जिंकत सुपर-८ फेरीत प्रवेश मिळविलेला आहे. तर कॅनडा विरुद्धचा साखळी फेरीतील चौथा सामना हा पावसामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे, अजिंक्य भारतासमोर आव्हान उभे करणे अफगाण संघासाठी नक्कीच सोपं नसणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 8 टी 20 सामने झाले आहेत. भारताने या 8 पैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 1 सामना हा अनिर्णित राहिला आहे. याचाच अर्थ टीम इंडिया अफगाणिस्तानवर कायमच वरचढ राहिली आहे. अफगाणिस्तानला टीम इंडिया विरुद्ध अद्याप जिंकता आलेले नसले तरी त्यांनी यंदा साखळी फेरीत दमदार कामगिरी करत सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला आहे.
अफगाणिनस्तानने युगांडा, न्यूझीलंड आणि पीएनजीवर विजय मिळवला. मात्र अफगाणिस्तानला विंडिजकडून पराभूत व्हावे लागले होते. आता अफगाणिस्तान टीम इंडिया विरुद्ध कशी कामगिरी करते, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
IND vs AFG : दोन्ही संघाचे संभाव्य Playing 11
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
अफगाणिस्तान : रशीद खान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, अझमतुल्ला उमरझाई, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, नांगयाल खरोती, नूर अहमद, नवीन-उल-हक, फझलहक फारुकी, फरीद अहमद मलिक आणि हजरतुल्लाह झझाई.
भारताला आव्हान देण्यास सज्ज – राशिद
आमचा संघ भारताला आव्हान देण्यासाठी सज्ज आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पराभवातून आम्ही बरेच धडे घेतले आहेत. त्या चूका पुन्हा करणार नाही. सुपर 8 मध्ये स्थान निश्चित कऱण्याचे आमचे पहिले लक्ष होते. त्यामध्ये आम्हाला यश मिळाले आहे. शेवटच्या साखळी सामन्यात आमचा पराभव झाला हे चांगलेय, कारण हाच पराभव नॉकआऊटमध्ये झाला असता तर परिणाम वेगळा झाला असता, असे अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू राशिद खानने सामन्यापूर्वी म्हटले आहे.





