T20 World Cup 2024 | टीम इंडियाच्या स्वागतासाठी क्रिकेटप्रेमींचा जनसागर, मुंबईतील वाहतूक झाली ठप्प; CM शिंदेंनी दिल्या विशेष सूचना….

T20 World Cup 2024 | Mumbai । Eknath Shinde : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टी20 वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकून मायदेशात दाखल झाली आहे. विजेत्या संघाचं राजधानीत दिल्लीत जोरदार स्वागत करण्यात आलं. यानंतर टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन चर्चा केली.
आता क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती टीम इंडियाच्या विजयी रॅलीची. टीम इंडिया मुंबईत दाखल होणार असून त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे.
2007 टी20 वर्ल्ड कपमध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्यांदा विजयी झाली होती. त्यावेळी देखील टीमची ओपन बसमधून मिरवणूक काढण्यात आली होती. 17 वर्षांनंतर या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होणार आहेत.
मुंबईत विमानतळावर दाखल झाल्यानंतर टी इंडियाची नरिमन पॉईंट ते वानखेडे मैदानापर्यंत ओपन बसमधून विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. टीम इंडियाच्या मिरवणुकीच्या ताफ्यात गुजरातच्या बसेस असणार आहेत.
विश्वविजेत्यांच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्ह परिसरात चाहत्यांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. असंख्य क्रिकेटप्रेमी मुंबईतील रस्त्यावर उतरल्यानं सर्वच वाहतूक ठप्प झाली असून, वाहतुकीत देखील बदल करण्यात आला आहे.
दरम्यान, अश्यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या परिस्थितीवर ट्विट करत मुंबई पोलीस दल आणि संबंधित यंत्रणांना विशेष सूचना दिल्या आहेत. एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘आयसीसी टी-20 विश्वचषक विजेता भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी जमलेल्या क्रिकेट प्रेमींच्या गर्दींचे संनियत्रण करण्याचे मुंबई पोलीस आयुक्तांना निर्देश दिले आहेत.
आयसीसी टी२० विश्वचषक विजेता भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी जमलेल्या क्रिकेट प्रेमींच्या गर्दींचे संनियत्रण करण्याचे मुंबई पोलीस आयुक्तांना निर्देश दिले आहेत. विजयवीर संघाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम तसेच नरीमन पॉईंट ते स्टेडियम दरम्यान, मरिन ड्राईव्ह या परिसरात मोठी…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 4, 2024
विजयवीर संघाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम तसेच नरीमन पॉईंट ते स्टेडियम दरम्यान, मरिन ड्राईव्ह या परिसरात मोठी गर्दी झाली आहे. या गर्दीमुळे वाहतुक विस्कळीत होऊ नये तसेच जमलेल्या क्रिकेट प्रेमींचीही गैरसोय होऊ नये याकडे मुंबई पोलीस दल आणि संबंधित यंत्रणांनी लक्ष पुरवावे, अनुषांगिक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दुरध्वनीद्वारे दिल्या आहेत.’ या आशयाचे ट्विट त्यांनी केलं आहे.





