T20 World Cup 2024 : बाबर आझमने रोहितसह-विराटचा विक्रम काढला मोडित, ठरला टी-20 मधील सर्वात यशस्वी फलंदाज…

Babar Azam broke Virat Kohli’s record : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार आणि दिग्गज फलंदाज बाबर आझमने गुरुवारी अमेरिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक 2024 सामन्यात विराट कोहलीला मागे टाकून मोठी कामगिरी केली. बाबर आझमने अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात 16 धावांचा टप्पा ओलांडताच तो आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला.
Leading the list 🔝@babarazam258 is the all-time top run-getter in T20Is 👏#T20WorldCup | #USAvPAK | #WeHaveWeWill pic.twitter.com/DoFs54cWZa
— Pakistan Cricket (@TheRealPCB) June 6, 2024
अमेरिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी बाबर आझम सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट कोहली (4038) आणि रोहित शर्मा (4026) यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर होता. पण आता बाबर दोन्ही भारतीय दिग्गजांना मागे टाकत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. यासामन्यात बाबरने 43 चेंडूत 44 धावांची खेळी केली.
असा आहे बाबरचा T20I मध्ये फलंदाजीचा विक्रम..
बाबर आझमने 120 सामन्यांच्या 113 डावांमध्ये 14 वेळा नाबाद राहताना 41.08 च्या सरासरीने आणि 129.77 च्या स्ट्राइक रेटने आतापर्यंत 4 हजार 067 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतके आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे. 122 ही बाबरची आंतरराष्ट्रीय T20 मधील सर्वोत्तम कामगिरी आहे.





