T20 World Cup 2024 : आयपीएलनंतर विश्वचषकातही ग्लेन मॅक्सवेल फ्लॉप, लाजिरवाण्या विक्रमाची केली नोदं…

T20 World Cup 2024 (AUS vs OMA ) : टी-20 विश्वचषक 2024 सुरु झाला आहे. गुरुवारी या स्पर्धेतील 10वा सामना ऑस्ट्रेलिया आणि ओमान यांच्यात झाला. ऑस्ट्रेलियन संघाने हा सामना 39 धावांनी जिंकला असला तरी ग्लेन मॅक्सवेलचा फॉर्म त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. आयपीएल 2024 नंतर, सध्याच्या स्पर्धेतही त्याचा शून्य बाद होण्याचा क्रम (सिलसिला)कायम आहे. तो काही काळापासून खराब फॉर्ममध्ये आहे.
ग्लेन मॅक्सवेलसाठी आयपीएल 2024 खूपच निराशाजनक होते. या मोसमात ग्लेन मॅक्सवेल अनेक वेळा एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये गेला. आयपीएलच्या 17 व्या मोसमात तो चार वेळा शून्यावर आऊट झाला होता. ग्लेन मॅक्सवेलने आयपीएल 2024 मध्ये 10 सामने खेळले, ज्यामध्ये तो केवळ 52 धावा जोडू शकला. ग्लेन मॅक्सवेलच्या खराब फॉर्मचा परिणाम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवरही झाला. त्यामुळे फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही. आता टी-20 विश्वचषकात ग्लेन मॅक्सवेलचा खराब फॉर्म कायम आहे.
टी-20 विश्वचषक 2024 मध्ये गुरूवारी ओमानचा संघ ऑस्ट्रेलियाशी सामना करत होता. या स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच सामना होता. मिचेल मार्शच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला, पण ग्लेन मॅक्सवेलच्या फॉर्मने कांगारूंच्या अडचणीत भर घातली आहे. वास्तविक, पहिल्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवेल झेलबाद झाला. अशाप्रकारे ग्लेन मॅक्सवेल गोल्डन डकचा बळी ठरला. याशिवाय क्षेत्ररक्षकाने ज्या पद्धतीने ग्लेन मॅक्सवेलचा झेल घेतला तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
T20 World Cup 2024 : युगांडाच्या गोलंदाजाने रचला इतिहास, वयाच्या 43 व्या वर्षी केला विश्वविक्रम…
टी-20 क्रिकेटमध्ये तो खाते न उघडता 33व्यांदा पॅव्हेलियनमध्ये परतला. या यादीत सुनील नरेनचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे, जो 44 वेळा गोल्डन डकचा बळी ठरला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा मॅक्सवेल हा चौथा फलंदाज ठरला आहे. मॅक्सवेलने आयर्लंडच्या पॉल स्टारलिंगला मागे टाकले आहे.
टी-20 मध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे फलंदाज
1. सुनील नरेन 44
2. एलेक्स हेल 43
3. राशिद खान 42
4. ग्लेन मॅक्सवेल 33
5. पाॅल स्टर्लिंग 32





