T20 World Cup 2022 : मेलबर्नवर रंगणार अंतिम लढत

मेलबर्न – ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक व सामन्यांची ठिकाणे जाहीर करण्यात आली आहेत. या स्पर्धेतील अंतिम सामना मेलबर्नवर होणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले आहे.
यंदा अमिरातीत झालेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद ऑस्ट्रेलियाने मिळवले व थाटात मायदेशात आगमन केले. तेव्हाच आयसीसीने या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करत सर्व संघांना आनंदाची बातमी देताना वेळापत्रकही लगेचच जाहीर केले.
पुढील वर्षी 16 ऑक्टोबरपासून ही स्पर्धा सुरु होणार आहे. 13 नोव्हेंबरला मेलबर्नच्या मैदानावर अंतिम सामना खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियामधील सिडनी व ऍडलेड ओव्हलवर 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी उपांत्यफेरीचे सामने खेळवले जाणार आहेत.
ब्रिसबेन, गीलॉंग, होबार्ट, पर्थ या चार मैदानांवर साखळी फेरीतील सामने खेळवले जातील. स्पर्धेच्या वेळी करोनाची परिस्थिती कशी असेल ते पाहून याबाबतचे नियम ठरवले जातील.





