T.Raja Singh : भाजपला मोठा धक्का ! तेलंगणाचे आमदार टी. राजा सिंह यांचा राजीनामा

हैदराबाद : तेलंगणाचे भाजप आमदार टी राजा सिंह यांनी सोमवारी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. माजी एमएलसी रामचंद्र राव यांना तेलंगणा भाजप अध्यक्ष बनवण्याच्या वृत्तावर तीव्र नाराजी व्यक्त करत गोशामहलच्या आमदाराने भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
टी. राजा सिंह यांनी धक्का आणि निराशा व्यक्त करून पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा भाजप तेलंगणा प्रदेशाध्यक्ष जी. किशन रेड्डी यांना पाठवला आहे. अधिक माहितीनुसार, टी. राजा सिंह यांच्यावर १०५ गुन्हेगारी गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी १८ गुन्हे जातीय गुन्ह्यांशी संबंधित आहेत. २०२२ मध्ये त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले.
ऑक्टोबर २०२३ मध्ये त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले. त्यानंतर त्यांनी गोशामहलमधून निवडणूक लढवली आणि तिसऱ्यांदा विजयी झाले. गोशामहलमधून तीनदा निवडून आलेल्या आमदाराने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे आणि तेलंगणात योग्य नेतृत्व नियुक्त करण्याचे आवाहन केले आहे.





