#IPL2022 | टी. नटराजनला पुनरागमनाची संधी – रवी शास्त्री
Updated On:

मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात सनरायझर्स हैदराबादकडून खेळत असलेला वेगवान गोलंदाज टी. नटराजन याला भारतीय संघातही पुनरागमन करण्याची संधी आहे, असा विश्वास भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक व माजी कसोटीपटू आणी समालोचक रवी शास्त्री यांनी व्यक्त केला आहे.
यंदाच्या वर्षी झालेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत त्याचा भारतीय संघात समावेश झाला नव्हता, त्यावेळी त्याची उणिव जाणवली होती. एक नेट गोलंदाज म्हणून त्याने कारकीर्दीला सुरुवात केली होती व 2020-21 साली झालेल्या मालिकांमध्ये खास करुन ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेत त्याची कामगिरी खूपच सरस झाली होती.
आता यंदाच्या आयपीएल स्पर्धेतही तो सातत्याने चांगली गोलंदाजी करत आहे, त्यामुळेच येत्या काळात तो भारताच्या संघात पुनरागमन करु शकेल, असेही शास्त्री यांनी म्हटले आहे.





