वडगावशेरी मतदार संघात यंत्रणा सज्ज; मतदान केंद्रावर सीसीटीव्हीचा वॉच

पुणे – वडगावशेरी विधानसभा मतदार संघात निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी सर्व यंत्रणा सज्ज झालेली आहे. सर्वच मतदान केंद्रावर बेव कास्टींग सुविधे अंतर्गत सीसीटीव्हीच्या माध्यमातून वॉच ठेवण्यात येणार आहे. व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिया उत्साहात पुर्ण करण्यासाठी विविध उपक्रमही राबविण्यात आलेले आहेत.
वडगावशेरी विधानसभा मतदार संघाचे निवडणुक निर्णय अधिकारी सचिन बारवकर, सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तृप्ती कोलते-पाटील यांनी पत्रकार परिषदेत निवडणुक यंत्रणेच्या जय्यत तयारी बाबत माहीती दिली आहे. या मतदार संघात एकुण ४४८ मतदान केंद्रे सज्ज ठेवण्यात आलेली आहे. मतदार संघात एकुण ५ लाख ३ हजार ५३९ एवढे मतदार आहेत. यात पुरुष मतदार २ लाख ५९ हजार ४५३, महिला मतदार २ लाख ४३ हजार ९८४, ट्रान्सजेंडर मतदार १०२ आहेत. निवडणुकीच्या कामकाजासाठी सुमारे २ हजार ५०० अधिकारी, कर्मचारी वापरण्यात येणार आहेत. त्यांच्या नियुक्ताही करण्यात आलेल्या आहेत. एका टिममध्ये केंद्र प्रमुख, पोलिंग अधिकारी, पोलीस शिपाई व अन्य शिपाई यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
निवडणुकीच्या रिंगणात एकुण १६ उमेदवार आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी दोन याप्रमाणी एकुण ८९६ मतदान यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. मतदारांनी वाहणे वेडीवाकडी वालू नयेत व त्यामुळे वाह्तुक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्रासाठी पार्किगंची सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत महापालिकेला सूचना देण्यात आलेल्या आहेत. आवश्यक त्यावैद्यकीय सुविधाही केंद्रावर सज्ज ठेवण्यत आले आहे. मतदान केंद्रापासून १०० मीटरच्या आत राजकीय कार्यकत्यांना कोणत्याही प्रकारचे बुथ उभारण्यास मनाई करण्यात आलेली आहे. मतदान केंद्राच्या आत मोबाईल घेऊन जाण्यासही सर्वांच मनाई करण्यात आलेली आहे.१४ केंद्र बदलण्यात आलेली आहेत.
गृह मतदानाच्या माध्यमातून ३१ पैकी २८ ज्येष्ठ नागरिकांनी मतदान केले आहे. टपाली मतदानासाठी १ हजार १०० मतदारांनी नोंदणी केलेली आहे. मतदानापुर्वी मतदार संघात विविध भरारी पथकांचा वॉचही राहणार आहे. यात गैरबाबी आढळून आल्यास कठोर कारवाईही करण्यात येणार आहे, अशी माहिती सचिन बारवकर, तृप्ती कोलते-पाटील यांनी दिली आहे.





