Syed Mushtaq Ali Trophy 2024 : श्रेयसची तुफानी शतकी खेळी, मुंबईचा गोव्यावर दमदार विजय…

हैदराबाद :– मुंबईचा कर्णधार असलेल्या श्रेयस अय्यरने सय्यद मुश्ताक आली करंडक स्पर्धेत धमाकेदार शतकी खेळीच्या जोरावर गोवा संघाला २६ धावांनी पराभूत केले.
A winning start to the season! 💪
Skipper Shreyas Iyer leads from the front as Mumbai secure a solid win in their opening game.#MCA #Mumbai #Cricket #Wankhede #BCCI pic.twitter.com/PGa9n2Ehdd
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) November 23, 2024
हैदराबाद येथील जिमखाना मैदानावर झालेल्या आजच्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने निर्धारित २० षटकांत ४ बाद २५० धावांचा डोंगर उभाररला. कर्णधार श्रेयस अय्यरने केवळ ५७ चेंडूत ११ चौकार व १० षटकार मारताना नाबाद १३० धावांची खेळी केली. त्याला पृथ्वी शॉने ३३ तर शम्स मुलाणीने ४१ धावांची खेळी करताना सुरेख साथ दिली. दर्शन मिसाळने २ तर शुभम तारी व हेरंब परब यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. अर्जुन तेंडुलकरला एकही बळी टिपता आला नाही.
विजयासाठी आवश्यक असलेल्या धावांचा पाठलाग करताना गोवा संघाचा डाव २० षटकांत ८ बाद २२४ धावांवर मर्यादित राहिला. सुयश प्रभुदेसाईने सर्वाधिक ५२ धावांची खेळी केली. त्याला ईशान गाडेकरने ४० तर विकासने ४७ धावा करताना सुरेख साथ दिली. अर्जुन तेंडुलकरने ९ धावांचे योगदान दिले. मात्र ते संघाला पराभवापासून वाचवू शकले नाहीत.





